Ajit Pawar News : "थोडक्यात वाचलो, नाहीतर आज मला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती"

Ajit Pawar News : चौथ्या मजल्यावरून लिफ्ट धाडकन खाली कोसळली!
Ajit Pawar News :
Ajit Pawar News :Sarkarnama

Baramati News : विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे इमारतीच्या लिफ्टमध्ये असताना, लिफ्ट चौथ्यामजल्यावरून धाडकन खाली कोसळली. बारामतीतील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यानची ही काल (दि.१४ जाने) घडलेली घटना आहे. 'काल मी थोडक्यात वाचलो नाहीतर आज माझ्यासाठी श्रद्धांजली वाहायला लागली असती, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar News :
Pankaja Munde : पंकजा म्हणतात, तिळाची उर्जा आणि गुळाचा गोडवा कायम राहावा..

"काल १४ तारखेच्या या घटनेबाबत मी कुठे बोललो नव्हतो, पण तुम्ही घरचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो. काल एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. चौथ्या मजल्यावर लिफ्ट घेऊन मी आणि डॉ. हार्डिकर, त्यांचं वय ९० आहे, त्यांना घेऊन लिफ्टमध्ये गेलो. लिफ्ट काही वर जाईना. तिथेच बंद झाली. यानंतर लाईट गेली. इतक्यात लिफ्ट धाडकन खाली कोसळली. खोटं नाही सांगत आज माझ्या श्रद्धाजलीचा कार्यक्रम झाला असता," असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, "पुण्यात एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेलो असता डॉ. हर्डीकर, सिक्युरिटी गार्ड व मी स्वतः लिफ्टमध्ये अडकलो आणि काही क्षणातच ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. बारामतीकरांनो शनिवार (ता.14) रोजी घडलेला प्रसंग पत्नी सुनेत्राला आणि आईला सुद्धा सांगितलं नाही, ही दुर्घटना एवढी गंभीर होती की, मी केवळ तुमच्या सर्व बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळे वाचलो आहे, अन्यथा आज माझी श्रद्धांजलीच व्हायलाच तुम्ही आला असता," अशा शब्दात खुद्द अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात घडलेल्या अपघाताची माहिती स्पष्ट केली.

हा अपघाताचा प्रसंग ऐकताना बारामती तालुक्यातील पणदरे पवईमाळकरांच्या अंगावरती शहारे उभे राहिले होते. दादा तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य आहे, असे माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप सभेत बोलले असता , "अरे योगेश तुझ्या आशीर्वादामुळेच मी वाचलो " अशा शब्दात पवार यांनी निर्माण झालेले सभेतील गंभीर वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com