Ajit Pawar News : माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या निवडणुकीत उमेदवार आहेत. त्यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत बारामतीमधील अमराई परिसरात असलेल्या पीडीसीसी बँकेत 'सहकार बचाव पॅनल'चे रंजन तावरे यांनी गंभीर आरोप केले होता की अजित पवारांचे पीए आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकाऱ्यांनी रात्री बँक उघडी ठेऊन मतदारांच्या याद्या बनवून पैशांचे पाकीट भरत होते.
तावरे यांच्या आरोपाविषयी पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, 'माझा काय संबंध. मी पीडीसीसी बँकेचा डायरेक्टर नाही. दीड दोन वर्षापूर्वीच मी माझा राजीनामा दिला आहे. तसं बघितलं तर त्या बँकेच्या विकास सोसायटीचा सभासद आहे. ज्याच्यावर आम्हाला दीर्घ मुदतीचे पीककर्ज मिळतं. माझा काही संबंध नाही.तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाच काम आहे. चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी.'
तावरे यांच्या पॅनेल विषयी देखील नाव न घेता अजित पवार म्हणाले की. 'समोरच्या पॅनलचं सगळं राजकारण पतसंस्थेत, शरद संकुलमध्ये चालतं. तिथे विकास सोसायटी, पतसंस्था, दूध सोसायटी अशा तीन संस्था आहेत. सहकार कायद्यानुसार त्यांना तिथे बसता येत नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असतील तर तिथेही सील ठोकलं असत. पण मला त्यात पडायचं नाही. ज्याच त्याला लखलाभ.'
पत्रकारांना उद्देशून अजित पवार म्हणाले, 'तुम्ही सारखं पीडीसीसी बँक पीडीसीसी बँक म्हणताय. जे निळकंठश्वेर पॅनेल मी उभा केलेले आहे. त्यातील एक तरी सदस्य तेथे होता का? कोणीच त्याच्यामध्ये नव्हतं. जे कोणी तेथे असेल त्याला प्रश्न विचारा. '
मंत्री आदिती तटकरे यांनी शेतकऱ्याची जमीन हडपल्याचा आरोप करण्यात एकनाथ शिंदे यांच्या आमदाराकडून करण्यात आला.त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, कुणावर आरोप केल्यानंतर त्या आरोपाचे पुरावे द्यावी लागतात. त्या आरोपांबाबत पुरावे दिल्यानंतर त्यामध्ये तथ्य असेल तर चौकशी केली जाते. आणि चौकशीनंतर खरी वस्तुस्थिती समोर येते.राजकीय जीवनामध्ये अशा प्रकारचे आरोप अनेकांवर यापूर्वी देखील झाले आहेत आणि चौकशी अंतिम त्याबाबतची वस्तुस्थिती देखील समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.