Pune MahaPalika : भाजपने पाठ फिरवली, शरद पवारांचही ठरेना... अजितदादांचा काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन करून आघाडीचा प्रस्ताव

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी रणनीती बदलत काँग्रेससोबत आघाडीची चाचपणी सुरू केली असून पुण्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.
Deputy CM Ajit Pawar during a political meeting as speculation rises over a possible NCP-Congress alliance for the upcoming Pune Municipal Corporation elections.
Deputy CM Ajit Pawar during a political meeting as speculation rises over a possible NCP-Congress alliance for the upcoming Pune Municipal Corporation elections.sarkarnama
Published on
Updated on

NCP Congress Alliance Pune News : पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहे. शिवाय माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याविरोधामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही आघाडीबाबत अद्याप सकारात्मक संदेश मिळालेला नाही. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात एकाकी पडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका निवडणुकीसाठी नवे भिडू शोधत असल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला फोन लावून पुणे महापालिकेसाठी आघाडीचा प्रस्ताव दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येणार याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका मांडली असली तरी स्थानिक नेते आणि खासकरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्ष प्रशांत जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी अनुकूल नसल्याचं चित्र आहे. असं असलं तरी अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडीच्या चर्चा बाबत सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र अजूनही याबाबात सकारात्मक निर्णय होत नसल्याने अजित पवार यांनी पुणे शहरामध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या पर्यायाची चाचपणी केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकत्र येण्याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव अजित पवार यांनी स्वतः ठेवला असल्याचे सांगितले जात आहे. पवार यांनी पुण्याची जबाबदारी असलेल्या आमदार सतेज पाटील यांना फोन करून आघाडीचा प्रस्ताव दिला असल्याचं बोललं जात आहे. याला वृत्ताला सतेज पाटील यांनीही दुजोरा दिला आहे.

Deputy CM Ajit Pawar during a political meeting as speculation rises over a possible NCP-Congress alliance for the upcoming Pune Municipal Corporation elections.
BJP Politics : शेवटच्या क्षणी रवींद्र चव्हाणांनी पत्ते फिरवले अन् भाजपने इतिहास रचत मिळवला दणदणीत विजय, प्रथमच नगराध्यक्षही झाला
Deputy CM Ajit Pawar during a political meeting as speculation rises over a possible NCP-Congress alliance for the upcoming Pune Municipal Corporation elections.
Maharashtra Political Live Updates : भाजप नगरसेवकाची मिरवणूक, गाडीवर फोडले फटाके अन् महिलांना जबर मारहाण

काँग्रेसही सकारात्मक विचार करणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांची युती जवळपास निश्चित झाली आहे. याबाबतची घोषणा येत्या 2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यात विरोध आहे. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून काँग्रेस देखील एकाकी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काँग्रेस आगामी महापालिकांच्या निवडणुका लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com