Pimpri BJP News : पिंपरीत भाजपला मोठा धक्का; प्रदेश प्रवक्ते ठाकरेंच्या गळाला, २५ तारखेला शिवबंधन बांधणार?

BJP Leader Join Shivsena : दुसऱ्या एका नेत्याने शरद पवार यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे
Eknath Pawar
Eknath PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवडमध्ये घरवापसीसह इनकमिंग, आउटगोइंग सुरू झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेते तथा प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. येत्या २५ तारखेला मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे भाजपला उद्योगनगरीत मोठा धक्का बसणार असून, आगामी निवडणुकांचे समीकरण काहीअंशी बदलणार आहे. (BJP state spokesperson Eknath Pawar will join Shiv Sena on October 25)

म्हणून शिवसेनेत प्रवेश

अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाल्याने भोसरीतून विधानसभेला इच्छुक असलेल्या एकनाथ पवारांना तिकीट मिळण्याची आशा मावळली होती. महायुतीमध्ये त्यांना ‘स्कोप’ राहिला नसल्याने त्यांनी गावाकडे मराठवाड्यात लोहा-कंधार मतदारसंघातून लढण्याची मोठी तयारी सुरू केली आहे. तेथे शेकापखालोखाल शिवसेनेचे प्राबल्य आहे, त्यामुळे विचारधारा एक असलेल्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश करायचे ठरवले आहे.

Eknath Pawar
Kolhapur Politics : बावनकुळेंनी निष्ठावंतांची समजूत घातली; पण नव्यांच्या शक्तिप्रदर्शनाने टेन्शन वाढविले

याबाबत अजित पवार महायुतीत आल्याने भाजप इच्छुकाची झाली गोची; आता गावाकडे जाऊन लढणार...या मथळ्याने ‘सरकारनामा’ने गेल्या महिन्यात २९ तारखेला वृत्त दिले होते. ते महिनाभरात निर्णय घेणार असून, शिवसेनेकडूनच गावाकडे लढतील, असेही या बातमीत म्हटले होते. ते आता खरे ठरणार आहे.

फटका बसण्याची शक्यता

जुने एकनिष्ठ भाजपाई पवार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या पक्ष सोडण्याचा मोठा फटका भाजपला शहरात त्यातही विधानसभा आणि महापालिका निवडणुकीला बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी २०१४ ला भोसरीतून विधानसभा लढवून ५२ हजार मते घेतली होती. महापालिकेत ते गेल्या टर्मला सभागृह नेते होते. तेथे आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. त्यामुळे विधानसभेला भोसरीत त्यांच्या उणिवेचा फटका भाजपला बसणार आहे. तो जास्त महापालिका निवडणुकीला जाणवेल. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क केला असता, आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

Eknath Pawar
Lalit Patil News : ड्रगमाफिया ललित पाटीलचा साथीदार अभिषेक बलकवडेच्या घरी आढळले तीन किलो सोने; पुणे पोलिसांची कारवाई

दरम्यान, पवार यांच्यानंतर आगामी निवडणुकीत प्रभावी ठरेल, त्यातही महापालिका निवडणुकीत रिझल्ट देईल, अशा दुसऱ्या एका स्थानिक वजनदार भाजप नेत्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरद पवार) गळ टाकला आहे. तोही नेता येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीत येईल, असा दावा या पक्षाच्या एका जबाबदार स्थानिक नेत्याने आज `सरकारनामा`शी बोलताना केला.

Eknath Pawar
Ahmednagar Crime News : राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या खुनात भाजप नगरसेवकावर दोषारोपपत्र; अधिवेशनात गाजले होते प्रकरण...

एकनाथ पवार यांच्यासह या वजनदार नेत्याने पक्ष सोडल्यास पालिकेच्या निवडणुकीत `अब की बार सव्वासौ पार` करणे भाजपला अवघड जाणार आहे. कारण भाजपच्या या नेत्यासह अजित पवारांबरोबर गेलेले अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारीसुद्धा शरद पवार गटात घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. त्यातील एकाने दिल्लीत जाऊन शरद पवारांची त्यासाठी गेल्या महिन्यात भेटही घेतलेली आहे.

Eknath Pawar
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणाची वर्णी : लंके की जगताप? दोघांची जबरदस्त फिल्डिंग!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com