Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar Speech : पार्थ पवारांना 'सुट्टी' नाय..! अजितदादा आता खडसावणारच...

Meeting of Partha Pawar and Gangster Gaja Marne : पार्थ आणि गुंड मारणे यांची भेट चुकीची असून याबाबत बोलणार असल्याचे सांगितले.
Published on

Ajit Pawar Speech : कुख्यात गुंड गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीची घटना अत्यंत चुकीची आहे. सामाजिक जीवनात काम करत असताना आपण कोणाला भेटतो याची माहिती असणे गरजेचे आहे. नाहीतर त्याची चुकीची चर्चा सुरू होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. पार्थ पवार यांच्याशी आपली भेट अद्याप झालेली नाही. त्यांना भेटल्यानंतर याबाबत बोलणार असल्याचे अजितदादांनी सांगितले. त्यामुळे पार्थ पवारांची सुटी नाय..! अजितदादा आता खडसावणारच... अशी परिस्थिती आहे. Ajit Pawar Speech

कोथरूड येथील कुख्यात गुंड गजा मारणे याची पार्थ पवार यांनी भेट घेतली होती. पार्थ यांनी गजानन मारणे याची सपत्नीक घेतलेली भेट चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रदीप देशमुख, बंडू केमसे यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Ajit Pawar
Manoj Jarange Patil Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदेंची चाल यशस्वी, जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा शांत?

या भेटीमुळे राजकीय वर्तुळांबरोबरच पोलीस दलात देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मारणे याच्यावर खून, खंडणी अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच यापूर्वी अनेकदा त्यांच्यावर मोक्का कारवाई देखील करण्यात आलेली आहे. शहरातील प्रमुख नामचीन गुंडांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जेलमधून सुटल्यानंतर त्याने काढलेली भव्य दिव्य रॅली देखील मोठा चर्चेचा विषय बनली होती.

सात महिन्यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडून अजित पवार काही मोठ्या नेत्यांबरोबर बाहेर पडले. आमचाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा करत राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजितदादा आणि त्यांचे इतर सहकारी सहभागी झाले. आगामी लोकसभा निवडणूक शिंदे - फडणवीस सरकारच्या मदतीने लढणार असल्याचेही अजित पवार यांनी जाहीर केलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानुसार बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार होण्याची तयारी देखील अजित पवार यांनी केली आहे. अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून ॲटिव्ह झाले आहेत. दोन आठवड्यापूर्वी त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात जाऊन भेटीसाठी घेतल्या होत्या.

तर आता त्यांनी खडकवासला लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान, गुंड मारणे याने सपत्नीक पार्थ पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणे याच्या घेतलेल्या भेटीबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ही अत्यंत चुकीची घटना आहे.

हे असं घडू नये, यासाठी आवश्यक ती काळजी राजकीय जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकाने घेतली पाहिजे. काही वर्षांपूर्वी पिंपरी - चिंचवडमध्ये आझमभाई पानसरे हे शहराध्यक्ष असताना माझ्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडला होता. एका व्यक्तीला त्यावेळेस आम्ही पक्षात प्रवेश दिला होता. ती व्यक्ती गुंड प्रवृत्तीची होती. कार्यक्रमानंतर त्याचा उलगडा झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला तातडीने पक्षातून काढून टाकण्यात आले होते.

राजकीय जीवनात काम करत असताना आम्हाला भेटण्यासाठी अनेकदा समोर असलेली व्यक्ती कोण आहे याची माहिती नसते. त्यामुळे पोलीस खात्याला सांगून ठेवले आहे की समोरची व्यक्ती कोण आहे याची माहिती आम्हाला देत जावे. नुकत्याच घडलेल्या या घटनेबद्दल चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी बोलणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

(Edited by Amol Sutar)

Ajit Pawar
Maratha Reservation : ...जेव्हा केसरकर जरांगेंना 'आदरणीय पाटीलजी' म्हणतात!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com