

Ajit Pawar News : अजित पवार शब्दाचा पक्का आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, असे अजित पवार आपल्या जाहीर भाषणांमधीन सांगत असतात. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत आला.
सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, 'मी एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर खासदार करतो. मी एखाद्याला सांगितलं याचा काटा काढतो तर काढतोच. पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करीन असा शब्द देतो.'
जय भवानी पॅनलच्या प्रचार्थ आयोजित सभेत अकोलेमध्ये अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, पुढच्या पिढ्यांनी आपल्याला काही म्हणू नये यासाठी बारकाईने सगळ्याचे नियोजन करण्यात येते. खडकवासल्यातील कालव्यावरील पाणी गळती रोखण्यासाठी पाइपलाइद्वरे पाणी देण्याची गरज आहे.
पाण्याच्या गळतीबाबात बोलताना ते म्हणाले, खडकवासल्यातून 1100 क्युसेकनी सोडलेले पाणी इंदापूरपर्यंत 230 क्युसेकनी पोहोचतं. त्यामुळे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची गळती थांबवून बंदिस्त पाईन लाईनद्वारे पाणी देत बचत करण्याची गरज आहे.
अजित पवार म्हणाले, इंदापूरच्या प्रलंबित पाण्याचा प्रश्न मी मार्गी लावणार आहे. मी शब्दाचा पक्का आहे. विधानसभेला, लोकसभेला कोणी कोणाच काम केलं हे मी पाहता 53 गावातील लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. शेटफळ, अकोले, न्हावी, रुई कळस या गावात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खडकवासल्यातून पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे देखील अजित पवारांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.