Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजितदादांनी इशारा देताच सुपेकरांसोबतच अमिताभ गुप्तांच्या अडचणी वाढल्या

Ajit pawar warning News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट इशारा देताच सुपेकरांसोबतच अमिताभ गुप्तांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर पोलसांनी कारवाई करण्यास सुरु केली आहे. हगवणे कुटुंबातील पाच जणांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना मदत करणाऱ्यावर कारवाईचा फास आवळण्यात येत आहे. पैशांच्या हव्यासापोटी सूनेला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या मुळशीतील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करत त्यांची बदली करण्यात आली होती.

त्यानंतर आता पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर व तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट इशारा देताच सुपेकरांसोबतच अमिताभ गुप्तांच्या अडचणी वाढल्या आहेत.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर अनेक संशयास्पद अधिकाऱ्यांची नावे पुढे येत आहेत. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यानंतर आता तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीड जिल्ह्यातील अशा बेकायदेशीर शस्त्र परवाने प्रकरणाचा आढावा घेतला आहे.

Ajit Pawar
Shivsena Split : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचे पाच खासदार कधी फुटणार? शिंदेंच्या खासदाराने मुहूर्त सांगितला

पुण्यात शस्त्र परवाने देताना अनेक वेळा गरज नसलेल्या व्यक्तींनाही परवाने दिले गेले आहेत. काही प्रकरणांमध्ये शस्त्र परवाना नाकारल्यानंतरही राजकीय ओळख वापरून परवाना मिळवला गेला. अशा सर्व प्रकरणांची चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar
Raj Thackeray-Uddhav Thackeray : राज-उद्धव जवळ, पण 'मनसे' लांब; युतीसाठी 'ती' अट ठरतेय डोकेदुखी!

पुण्यात जसे काही शस्त्र परवाने रद्द करण्यात आले, त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातही गरज नसलेल्या शस्त्र परवान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील प्रकरणांची गंभीरता पाहता खबरदारीचा उपाय म्हणून बीडमध्येही असे परवाने रद्द करण्यात आले, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Uddhav Thackeray : मनसेसोबत युती होणार म्हणजे होणार! यावर शिक्कामोर्तब करणारं उद्धव ठाकरेंच पहिलं मोठं विधान, म्हणाले,...

वैष्णवी हगवणे प्रकरणात हुंडाबळी, कौटुंबिक अत्याचार, बेनामी संपत्ती, आणि बड्या अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपातून केलेले गैरकारभार यासारख्या अनेक गोष्टी आता उघड होत आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित हगवणे कुटुंबीय, तसेच जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांचा सहभाग समोर आला आहे.

Ajit Pawar
NCP News: 'त्या' सात आमदारांमुळे अजितदादांच्या स्वप्नाला खीळ; 2 वर्षांपासून केलेले प्रयत्न ठरले व्यर्थ

अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त असताना ५०० ते ५५० शस्त्र परवाने दिल्याची माहिती आहे. या सर्व परवान्यांची सखोल चौकशी सुरू असून पुनर्रिव्ह्यू करून अवैध परवाने रद्द करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे अमिताभ गुप्ता यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Ajit Pawar
BJP Politics : यंदा भाजपचं मोठं टार्गेट, नुसतं नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या चारही महापालिका ताब्यात घेण्याचा निर्धार

वैष्णवी हगवणे प्रकरणात सतत जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप होताना दिसत आहेत. कसपटे कुटुंबियांनी थेट जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीच्या नावाने पैसे पाठवल्याचेही पुढे आले. दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली होती. जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. आता तिथुन त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड या पदावर पाठवण्यात आले होते.

Ajit Pawar
Sudhakar Badgujar BJP : सुधारक बडगुजरांच्या भाजप प्रवेशासाठी 'संकटमोचक' जुळवाजुळव करणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com