Ajit Pawar To Atul Benke : अजितदादांनी डाव टाकला; पवारांनी गाडीत फिरवलेल्या बेनकेंवर आली नवी जबाबदारी...

NCP Politics : येत्या ७ ऑक्टोबर रोजी ओझर (ता. जुन्नर) येथे ग्राहक पंचायत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या नियोजनाची जबाबदारी आमदार अतुल बेनके यांच्याकडे असणार आहे.
Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
Ajit Pawar-Atul Benke-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शरद पवार यांनी रविवारी (ता. १ ऑक्टोबर) जुन्नरच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संपर्कात असलेले आमदार अतुल बेनके यांना गाडीत घेऊन फिरवले. त्याला २४ तास होण्याआधीच अजितदादांनी नवा डाव टाकला आहे. जुन्नर तालुक्यात पाच दिवसांनी होणाऱ्या ग्राहक मेळाव्यास उपस्थिती लावण्याचे उपमुख्यमंत्री पवारांनी मान्य केल्याचे सांगितले जात आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची जबाबदारी बेनके यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे आदिवासी विकास परिषदेप्रमाणे हा ग्राहक पंचायत मेळावाही बेनकेंना यशस्वी करून दाखवावा लागणार आहे. (Ajit Pawar will attend the consumer panchayat meeting in Junnar?)

आदिवासी राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी (ता. १ ऑक्टोबर) जुन्नरच्या दौऱ्यावर होते. त्या परिषदेचे आमदार बेनके हे स्वागताध्यक्ष होते. आता ती जबाबदारी पार पाडून २४ तास उलटण्याच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून बेनकेंवर दुसरी जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे बेनके हे येत्या ७ ऑक्टोबर रोजी ओझर (ता. जुन्नर) येथे होणाऱ्या ग्राहक पंचायत मेळाव्याचे नियोजन कसे करतात, हे पाहावे लागणार आहे.

Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
Sharad Pawar Junnar Tour : तटस्थ आमदार बेनकेंना पवार आपल्या गाडीतून कार्यक्रमाला घेऊन गेले

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आमदार अतुल बेनके यांनी आगामी निवडणूक लढवावी की लढवू नये, अशा मनस्थितीत असल्याचे सांगितले होते. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटात न जाता आपण तटस्थ राहणार असल्याची भूमिकाही बेनके यांनी मांडली होती, पण गेल्या काही दिवसांपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात होते. त्यासाठी विकास निधी, कांद्याचा प्रश्न, त्यासाठी केंद्र सरकारकडे करावा लागलेला पाठपुरावा, ही त्यामागची काही कारणं असू शकतात.

दरम्यान, बिरसा ब्रिगेडच्या वतीने जुन्नरमध्ये रविवारी आदिवासी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार बेनके हे त्या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते. त्यामुळे स्वागतापासून शेवटपर्यंत ते पवारांसोबत होते. पवारांनी हेलिपॅडवरच खास बोलावून त्यांना गाडीत बसविले होते. तसेच, विघ्नहर सहकारी साखर काखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांच्या घरी एकत्र स्नेहभोजन घेणे आणि त्यानंतर माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या तब्यतेची विचारपूस करण्यासाठी आमदार बेनके यांच्या घरी जाणे, या दौऱ्याची राज्यभर चर्चा झाली आहे.

Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
kolhapur Politics : ए. वाय. पाटलांचे कार्यकर्ते आक्रमक; ‘बिद्री कारखाना अथवा आमदारकी, वरिष्ठांकडून शब्द घ्या’

आमदार बेनके यांच्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने ओझर येथे होणाऱ्या ग्राहक पंचायत मेळाव्याची जबाबदारी असणार आहे. त्या मेळाव्यास उपमुख्यमंत्री पवार यांनी येण्याचे मान्य केल्याचे सांगितले जात आहे. त्या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे हा मेळावा यशस्वी करून दाखवण्याची जबाबदारी अतुल बेनके यांना पार पाडावी लागणार आहे.

Ajit Pawar-Atul Benke-Sharad Pawar
Pankaja-Bawankule Visit : पंकजा मुंडेंनी भेटीसाठी आलेल्या बावनकुळेंना दीड तास ठेवले वेटिंगवर?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com