Sharad Pawar Junnar Tour : तटस्थ आमदार बेनकेंना पवार आपल्या गाडीतून कार्यक्रमाला घेऊन गेले

Atul Benke News : विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकरही पवारांसोबत कायम होते. शेरकर यांच्याकडे दुपारचे भोजनही पवारांनी घेतले. त्यामुळे पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न जुन्नरकर विचारत होते.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (ता. १ ऑक्टोबर) आदिवासी राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने जुन्नरच्या दौऱ्यावर होते. या वेळी पवारांनी अपण तटस्थ म्हणून सांगणारे, पण अजित पवार गटाकडे झुकलेले जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना गर्दीतून बोलावून घेत आपल्या गाडीतून कार्यक्रमस्थळी नेले. कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत पवारांनी बेनकेंना सोडले नाही, त्याची चर्चा जुन्नरमध्ये चांगलीच रंगली आहे. (Sharad Pawar took neutral MLA Atul Benke to the venue in his car)

बिरसा ब्रिगेडच्या वतीने आज जुन्नरमध्ये आदिवासी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला पवारांची प्रमुख उपस्थिती होती. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास पवारांचे हेलिकॉप्टर उतरले. आमदार बेनके यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेतेमंडळींनी पवारांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.

Sharad Pawar
Pankaja-Bawankule Visit : पंकजा मुंडेंनी भेटीसाठी आलेल्या बावनकुळेंना दीड तास ठेवले वेटिंगवर?

या गर्दीतून पवारांनी आमदार अतुल बेनके यांना बोलावून घेत गाडीत बसण्याची खूण केली. पवारांच्या गाडीत बेनके यांच्यासोबत विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकरही मागच्या सीटवर बसले होते. कारखान्याच्या हेलिपॅडवरून पवारांचा ताफा थेट अध्यक्ष शेरकर यांच्या निवासस्थानी गेला. त्या ठिकाणी या सर्व नेतेमंडळींनी दुपारचे भोजन केले.

शेरकर यांच्या निवासस्थानाहून शरद पवारांचा ताफा थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचला, त्यावेळी बेनके हे पवारांच्याच गाडीत होते. कार्यक्रमानंतर पवार यांनी आपले एकेकाळचे सहकारी, आमदार अतुल बेनके यांचे पिताश्री माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या तब्यतेची घरी जाऊन विचारपूस केली.

Sharad Pawar
Maharashtra Politics : आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकर म्हणाले; ‘ज्यांना संविधानाची माहिती नाही, त्यांच्या दबावाला...’

जुन्नरच्या संपूर्ण दौऱ्यात पवारांनी आमदार बेनके यांना आपल्या गाडीत घेऊनच प्रवास केला. यादरम्यान काय चर्चा झाली. कोणती रणनीती ठरली, याची माहिती मिळू शकलेली नाही. विकासकामांच्या निमित्ताने आमदार बेनके हे अजित पवार गटाच्या जवळ गेलेले आहेत. कांदा प्रश्नावर त्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत दिल्लीत जाऊन वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली आहे, त्यामुळे अजितदादांच्या गोटातील आमदार बेनके यांना संपूर्ण दौऱ्यात पवार हे बरोबर घेऊन फिरल्याने त्याची चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकरही पवारांसोबत कायम होते. या दौऱ्यात शेरकर यांच्याकडे दुपारचे भोजनही पवारांनी घेतले. त्यामुळे पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न जुन्नरकर विचारत होते.

Sharad Pawar
kolhapur Politics : ए. वाय. पाटलांचे कार्यकर्ते आक्रमक; ‘बिद्री कारखाना अथवा आमदारकी, वरिष्ठांकडून शब्द घ्या’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com