अजितदादा बोट दाखवतील तो जिल्हा बँकेचा अध्यक्ष; ५ नाव चर्चेत

PDCC Bank : भाजपाच्या 'सीसीटिव्ही'मुळे अध्यक्ष चलाखच हवाय...!
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

शिक्रापुर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (PDCC Bank election) अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी शनिवारी (दि. १५) पार पडणार आहे. या निवडीसाठी शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेत सर्व नवनिर्वाचित संचालकांना आमंत्रित केले असून त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अध्यक्ष-उपाध्यक्ष ठरवणार आहेत. त्यामुळे बाकी कोणाचे लॉबिंग किंवा कोणच्या नावाच्या सर्वाधिक चर्चा आहेत याला काहीही महत्व नसल्याचे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेले विद्यमान अध्यक्ष तथा सर्वात जेष्ठ संचालक रमेशआप्पा थोरात (Ramesh Thorat) यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या जिल्ह्यात ५ संचालकांच्या नावाची अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा आहे, मात्र अशा चर्चांना काहीच अर्थ नाही. जिल्ह्याचा सर्वांगिण विचार करुन अजित पवार अध्यक्षपदाचा निर्णय शनिवारी निवडीचे दिवशी सकाळी १० वाजता घेणार असून त्याबाबत सर्व संचालकांना कळविले आहे, असेही रमेशआप्पा थोरात यांनी सांगितले.

Ajit Pawar
२१ कोटींची मेहेरबानी; सरनाईकांसाठी थेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कोणाकोणाची नाव चर्चेत?

पुणे जिल्हा बँकेच्या (PDCC bank) अध्यक्षपदासाठी सध्या स्वत: रमेशआप्पा थोरात यांच्यासह त्यांच्या इतकेच जेष्ठ असलेले संचालक संजय काळे, तसेच आमदार आणि पहिल्यांदाच संचालक म्हणून शिरुरमधून जिल्हा बॅंकेत प्रवेश केलेले अशोक पवार, विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे आणि आमदार दिलीप मोहिते अशा पाच जणांमधून अध्यक्ष निवडला जाईल अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र या सगळ्यांच्या नावातही दौंड विधानसभेची कसर भरुन काढण्यासाठी अध्यक्षपदावर थोरात यांचा दावा पूर्वीइतकाच भक्कम आहे.

दुसरीकडे विधानसभेला ४१ हजारांच्या मोठ्या मताधिक्याने आणि बॅंकेच्या निवडणुकीत तब्बल ८५ टक्के मताधिक्याने विजयी झालेले अशोक पवार (Ashok Pawar) हे अध्यक्षपदासाठी सर्वाधिक उजवे ठरू शकतात. जुन्नरमधून प्रत्येक आमदारकीवेळी तडजोड म्हणून बॅंकेत राहणाऱ्या संजय काळेंना (Sanjay Kale) यांचेही नाव आघाडीवर आहे. मागच्या अनेक वर्षांपासून संजय काळेंकडे संचालक पद तर अतुल बेणकेंकडे आमदारकी हे समीकरण जुन्नर तालुका अनुभवत आहे. मात्र यावेळी त्याचेच उट्टे काढण्याची संधी काळे घराण्याकडे यावेळी आहे. पण जर यंदा त्यांना अध्यक्षपद मिळाले नाही तर त्यांच्या वयाचा विचार करता ते ना आमदार, ना बॅंकेचे अध्यक्ष केवळ संचालक एवढीच राजकीय कारकिर्द ठरणार आहे.

या उलट यापूर्वी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राहिलेले पुरंदरचे प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्यावर कोणताही डाग नाही. त्यांचा अर्थशास्त्र विषयही पक्का आहे. नोटाबंदी काळातील बॅंकेचे अडकलेले पैसे परत आणण्याच्या तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटलींच्या बैठकीसाठीही दुर्गाडे यांनाच पाठविण्यात आले होते. त्यामुळे दुर्गाडेंना संधी मिळाल्यास ती आश्चर्याची गोष्ट ठरणार नाही. मंत्रीपदासाठी कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह असलेले खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनाही मंत्रीपदाऐवजी अध्यक्षपदाची लॉटरी लागण्याची आशा आहे. की यापलिकडे जात दोन महिला संचालिकांपैकी कोणाची वर्णी लागते त्याचीही उत्सूकता असणार आहे.

Ajit Pawar
संजय राऊत बड्या नेत्याच्या भेटीला; UP निवडणुकीत शिवसेना करणार जिवाचं रान

भाजपाच्या 'सीसीटिव्ही'मुळे अध्यक्ष चलाखच हवाय...!

पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळात यावेळी पहिल्यांदाच भाजपाच्या दोन संचालकांची इंट्री झाली आहे. त्यातही विशेष म्हणजे दोन्ही संचालक थेटपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच संपर्कात असतात. त्यामुळे बॅंकेच्या कारभारावर भाजपाकडून या दोघंच्या माध्यमातून थेट कारभारावर बारीक लक्ष ठेवले जाणार हे निश्चित. पर्यायाने अध्यक्ष-उपाध्यक्ष कार्यक्षम, मुरब्बी व चाणाक्ष निवडणे हेही राष्ट्रवादीसाठी महत्वाचे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com