उशीर झाल्यामुळे अजितदादा बोलले नाहीत : सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

Supriya Sule : अधिवेशनात अनेकांना बोलायला मिळाले नाही, उशीर झाल्यामुळे भाषण
 Supriya Sule|
Supriya Sule|Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : नुकतंच दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. अधिवेशनात सर्वाधिक लक्षवेधी बाब ठरली ती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याबाबतीत माध्यमात आलेल्या नाराजी-नाट्य वृत्तांचे. अजित पवार (Ajit Pawar) अचानक स्टेजवरुन निघून गेले. यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रीया दिली आहे, "काल दादांचे भाषण झाले नाही. अधिवेशनात अनेकांना बोलायला मिळाले नाही, कार्यक्रमाला उशीर झाला, त्यामुळे दादांनी भाषण करायला नाही म्हंटले, असे स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी केले. सुप्रिया सुळे आज फुरसुंगी या ठिकाणी आल्या होत्या, यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) अचानक स्टेजवरुन निघून गेले होते. यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आता या घटनेवर राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांकडूनही प्रतिक्रीया येत आहेत.

 Supriya Sule|
'सीतारमण यांना बारामती 'मॉडेल' पाहण्यासाठी तीन दिवस पुरणार नाहीत!'

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावर प्रतिक्रीया दिली आहे. ''अजित पवार नाराज नाहीत. अधिवेशन सुरु असताना त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते उठून बाहेर गेले आणि काही मिनीटातच ते परत आले. अजित पवार सकाळपासून तेथे उपस्थित होते. दुपारी २.४५ च्या सुमारास ते फ्रेश होण्यासाठी वाॅशरूमकडे गेले होते. तेव्हापासून दादा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण या चर्चांमध्ये काही दम नाही. कारण मी स्वतः तेथे उपस्थित होतो, असे स्पष्टीकरण अमोल मिटकरी यांनी सरकारनामाशी बोलताना दिले.

यावर स्वत: अजित पवार यांनीसुद्धा खुलासा केला आहे. "दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. पण मी अधिवेशनातून उठून गेलो म्हणून माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला. राष्ट्रीय अधिवेशन असल्याने मी बोललो नाही. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून ते आधी बोलले, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com