Tanisha Bhise death : "10 कोटींची जागा एक रुपयात पदरात पाडून घेतली अन् विश्वासघात केला..."; दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर चित्रा वाघ संतापल्या

Dinanath Mangeshkar Hospital controversy : "सुशांत भिसे आपल्या पत्नीचा आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या दोन लेकरांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे विनवणी करत होते. पण मुर्दाड मनाच्या त्या डॉक्टरांना तनिषाच्या प्रसूती वेदना समजत नव्हत्या की हतबल झालेल्या नवऱ्याचे दुःख."
Chitra Wagh On Dinanath Mangeshkar Hospital
Chitra Wagh On Dinanath Mangeshkar HospitalSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 04 Apr : भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. तनिषा भिसे यांच्या मृत्युला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप भिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी रुग्णालयाने कुटुंबियांकडून दहा लाखांची मागणी केली. शिवाय रुग्णालयात वेळेत उपचार न दिल्यामुळेच तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. तर या घटनेवरून आता राज्यातील राजकारण तापलं आहे.

विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला लक्ष केलं आहे. एका आमदाराच्या पीएच्या पत्नीची ही अवस्था आहे तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. राज्यभरातून रुग्णालय प्रशासनावर टीका आणि आरोप होत आहेत.

अशातच आता सत्ताधारी भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील दीनानाथ मंगेशकर चॅरिटेबल ट्रस्टने सरकारचा विश्वास घात केल्याची टीका केली. तसंच रुग्णालयावर कडक कारवाई करत संबंधित डॉक्टरांचे निलंबन करण्याची मागणी त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.

Chitra Wagh On Dinanath Mangeshkar Hospital
Pune News : आमदाराच्या पीएच्या पत्नीचा प्रसुतीवेळी मृत्यू, आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; पाच सदस्यांची समिती गठीत!

चित्रा वाघ यांनी एक्सवर पोस्ट करत या सर्व प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने (Dinanath Mangeshkar Hospital) 10 कोटी किमतीची आठ हजार चौरस फूट जमीन राज्यसरकारकडून 1 रुपया भाड्याने पदरात पाडून घेतली. राज्य सरकारने देखील रुग्णसेवेसाठी मोठ्या विश्वासाने चॅरिटेबल ट्रस्ट असलेल्या या रुग्णालयाला ती जमीन दिली पण त्यांनी सरकारचा विश्वास घात केला.

10 लाखांसाठी एका निष्पाप जीवाचा बळी घेतला. सुशांत भिसेंकडे 20 लाखांची मागणी करुन 10 लाख भरायला सांगितले. तेव्हा आपल्या पत्नीचा आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या दोन लेकरांचा जीव वाचवण्यासाठी भिसे डॉक्टरांकडे विनवणी करत होते. पुढच्या दोन तासांत गावाकडची शेती विकून पैसे भरतो, पण अॅडमीट करून घ्या, असं जिवाच्या आकांताने ओरडून सांगत होते.

Chitra Wagh On Dinanath Mangeshkar Hospital
Shivsena UBT Politics : अंबादास दानवेंनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट; 'स्थानिक'च्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटातील अंतर्गत वाद उफाळणार?

पण मुर्दाड मनाच्या त्या डॉक्टरांना तनिषाच्या प्रसूती वेदना समजत नव्हत्या की हतबल झालेल्या नवऱ्याचे दुःख."; अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. तसंच यावेळी त्यांनी दीनानाथ रुग्णालयावर कडक कारवाई करावी आणि संबंधित डॉक्टरांचे निलंबन व्हायलाच पाहिजे, अशी मागणी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्याकडे केली.

तर आज जन्मताच दोन लेकरं आईच्या मायेला पोरकी झाली. ती केवळ चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली दुकान उघडलेल्या डॉक्टरांच्या लालसेमुळेच, असंही वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार रूग्णालयावर काय कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कायदेशीर कारवाई करणार - आरोग्यमंत्री

दरम्यान, या घटने प्रकरणी पुण्याचे आरोग्य उपसंचालक आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीला आपण चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. तर या चौकशी समितीच्या माध्यमातून रुग्णालयाचे आणि त्या कुटुंबाचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जाईल आणि त्यानुसार अहवाल समोर येईल. त्या अहवालानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही आबिटकर यांनी म्हटलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com