Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) भाजपचे अधिवेशन पुण्यात होत आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचे मुख्यमंत्री कोण, यावर भाष्य केले नाही. मात्र, गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात विधानसभेच्या नेतृत्वाबाबत सूचक इशारा दिला.
'महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत येणार हे मला स्पष्ट दिसत आहे.भाजपच्या नेतृत्त्वातच महायुतीचे सरकार असणार' असे अमित शाह म्हणाले.
नेतृत्वाबाबत अमित शाह यांनी बोलून मुख्यमंत्री पद हे भाजपकडे असण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. मला आज कार्यकर्ते भेटत आहेत. मी त्यांच्याशी बोललो पण कार्यकर्ते संभ्रमात दिसत आहेत. भ्रम पसरवण्याचे काम विरोधकांनी केले आहे, असे अमित शाह म्हणाले.
अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकला विरोधी पक्ष काँग्रेस पराभूत झाला. माझ्या राजकीय जीवनात मी विजयी झाल्यावर अहंकार निर्माण झालेले पाहिले आहेत. मात्र, पराभूत होऊन जगात अहंकार निर्माण झालेला राहुल गांधी हे एकमेव उदाहरण आहे. त्यांचा अहंकार उतरवण्यासाठी प्रचंड बहुमताने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडमध्ये सत्ता आणायची आहे, असे आवाहन केले आहे.
'विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. खोट्या नेरेटिव्हला उत्तर द्या. भाजपचे येवढे कार्यकर्ते आहेत की त्यांनी रोज एक जरी पोस्ट टाकली तरी फेक नेरेटिव्ह टिकणार नाही.', असे आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.