Video Amit Shah : महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वात युतीचे सरकार करायचे का? अमितभाईंचा सवाल

Amit Shah In BJP state conclave in Pune : अमित शाह यांनी भाजपच्या 'चिंतन' बैठकीत महायुतीबाबात केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे.
amit shah (1).jpg
amit shah (1).jpgsarkarnama
Published on
Updated on

BJP state conclave in Pune : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची पुण्यात 'चिंतन' बैठक पार पडत आहे. या बैठकीच्या माध्यमातून भाजपनं विधानसभेचं बिगुल वाजवलं आहे. पण, या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्याच वाक्यात केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे.

"महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वात युतीचं सरकार बनवायचं आहे की नाही?" असा थेट सवाल अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना विचारला आहे.

नेमकं काय घडलं?

अमित शाह ( Amit Shah ) भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांनी 'भारत माता की', अशी घोषणाबाजी केली. त्यावर कार्यकर्त्यांनी 'जय' असं म्हटलं. पण, मोठ्यानं घोषणाबाजी झाली नसल्यानं अमित शाह नाराज झाले. "महाराष्ट्र वाल्यांच्या आवाजाला काय झालंय? महाराष्ट्रात युतीच्या नेतृत्वात सरकार बनवायचं आहे की नाही? जोरात सांगा सरकार बनवायचं की नाही? पुन्हा एकदा विजय अभियान चालवायचं की नाही?" असे प्रश्न अमित शहांनी कार्यकर्त्यांना विचारले.

यानंतर अमित शहांनी भारत माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं घोषणाबाजी केली.

amit shah (1).jpg
Amit Shah Vs Sharad Pawar : मराठा आरक्षणावरून अमित शहांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले...

अमित शाह म्हणाले, "2014, 2019 पेक्षा मोठा विजय 2024 मध्ये प्राप्त करण्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यावे लागतील. अनेकांना निवडणुकीत विजयी झाल्यावर अहंकारी होताना पाहिलं आहे. विजयी झाल्यावर अहंकार येण्याचे शेकडो उदाहरण जगातील राजकारणात पाहताना मिळतील. पण, राहुल गांधी ( Rahul Gandhi ) पराभव झाल्यानंतर अहंकारी बनले आहेत."

amit shah (1).jpg
Amit Shah : महायुतीत मुख्यमंत्रीपद भाजपकडे! अमित शाह यांचे सूचक विधान

"भाजपला 240 आणि 'एनडीए'ला 300 जागा मिळाल्या आहेत. मात्र, पूर्ण 'इंडिया' आघाडीला 240 जागाही मिळाल्या नाहीत. काँग्रेसला 2014, 2019 आणि 2024 मध्ये मिळालेल्या जागा एकत्र केल्या तरी 240 चा आकडा होत नाही. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांतील सरकारवर मोहर उमटविण्याचं काम केलं आणि तिसऱ्यांदा बहुमतानं सरकार चालविण्याचा अधिकार दिला आहे," असं अमित शहांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com