Amit Shah visits Pune : चिंचवडच्या कार्यक्रमानंतर शहा दिल्लीला रवाना होणार ; पुण्यातील कार्यक्रम रद्द

Pune News : बुथ कमिटी सदस्य आणि काही नेत्यांच्या भेटीसाठी त्यांनी वेळ राखून ठेवला होता,
Amit shah
Amit shahSarkarnama
Published on
Updated on

Pune : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे आज (रविवार) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचा एकच कार्यक्रम चिंचवडला आहे, पण या कार्यक्रमानंतर पुण्यातील बुथ कमिटी सदस्य आणि काही नेत्यांच्या भेटीसाठी त्यांनी वेळ राखून ठेवला होता, पण आता यात बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शहा हे चिंचवडच्या कार्यक्रमानंतर ते मुक्कामास असलेल्या पुण्यातील हॉटेलमध्ये जाणार असून तेथून ते दिल्लीला रवाना होणार आहेत.

चिंचवडच्या कार्यक्रमानंतर ते पुण्यात वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्याची किंवा भाजप नेत्यांशीदेखील संवाद साधण्याची शक्यता होती, पण आता हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS)कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उदघाटन शहा यांच्या हस्ते चिंचवड येथे होणार आहेत.देशात 1550 हून अधिक नोंदणीकृत बहु-राज्य सहकारी संस्था आहेत.त्यांचे कामकाज सुलभ व्हावे म्हणून हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

Amit shah
Maharashtra Cabinet Expansion : शहा-शिंदे-फडणवीस-पवारांच्या बैठकीत अखेर ठरलं ! मंत्रिमंडळ विस्तार आठवडाभरात..

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी काल (रविवारी) शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. केंद्राने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता इच्छुकांची लॉबिंग सुरू झाली आहे. राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. याबाबतचे वृत्त काल (शनिवारी) 'सरकारनामा'ने दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com