Amit Thackeray: अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन येणारच! अमित ठाकरेंचा ABVP ला इशारा; पुण्यातल्या राड्यानंतर मनविसे प्रमुख आक्रमक

Amit Thackeray reaction: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि रा. स्व. संघाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता.
Amit Thackeray on ABVP
Amit Thackeray on ABVP
Published on
Updated on

Amit Thackeray reaction: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि रा. स्व. संघाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. एका महाविद्यालयात पत्रकं चिकटवण्यावरुन निर्माण झालेला हा वाद अभाविपचं कार्यालय फोडण्यापर्यंत पोहोचला होता. यानंतर मनविसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले होते. यापार्श्वभूमीवर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज पुण्यात भेट दिली. पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी या वादावर सविस्तर चर्चा केली. तसंच बाहेर माध्यमांशी बोलताना अभाविपला इशाराही दिला.

मनविसे आणि अभाविप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी मनविसेच्या सुमारे ३० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची अमित ठाकरेंनी भेट घेतली तसंच त्यांना संपूर्ण प्रकरणं समजावून सांगितलं. त्याचबरोबर पुण्यातील एकंदरीत कोलमडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी आपली जबाबदारी ओळखून योग्य ती पावलं उचलल्यास आम्हाला गोष्टी हातात घ्याव्या लागणार नाहीत, अशी अपेक्षा ठाकरेंनी व्यक्त केली.

Amit Thackeray on ABVP
IPS Puran Kumar मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता चौकशी अधिकाऱ्यानंच संपवलं जीवन! मोठ्या कट-कारस्थानाचा संशय

अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, पोलीस आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर बाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले, "मी माझ्या मुलांच्या (मनविसे कार्यकर्ते) मागे ठामपणे उभा आहे. विद्यार्थ्यांच्या कामात कोणी अडथळा आणला तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शांत बसणार नाही. मग Actionला Reaction येणारच..! मनविसेचं काम म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे आणि ते कोणी थांबवायचा प्रयत्न केला तर उत्तरही ‘मनसे स्टाईल’मध्येच दिलं जाईल." याद्वारे त्यांनी अभाविपला एक प्रकारे इशाराच दिला आहे. पुन्हा वाद झाल्यास त्याला जशास तसं उत्तर देऊ अशी भूमिका त्यांनी मांडली.

Amit Thackeray on ABVP
Nagpur News: फक्त खानापूर्ती नकोय! नागपूर पदवीधरसाठीच्या इच्छुकांना मुख्यमंत्र्यांची कडक शब्दांत तंबी

नेमका वाद काय?

पुणे स्टेशनजवळील वाडिया कॉलेजमध्ये मनविसेच्या शाखेचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नेमका या कार्यक्रमाच्या ठिकाणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेची पत्रकं लावली. यावरुन दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यानंतर सोमवारी ‘मनविसे’चे कार्यकर्ते अभाविपच्या सदाशिवपेठेतील कार्यालयात घुसले आणि त्यांनी घोषणाबाजी करत या कार्यालयात आपल्या संघटनेची पत्रकं चिटकविली तसेच कार्यालयाची तोडफोड केली तसंच शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली, असं अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी मनविसेच्या सुमारे ३० जणांवर गुन्हे दाखल केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com