विजय चोरमारे
Mumbai News: कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची (Arun Gawli News) मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench Bombay High Court) दिले आहे.
लोकसभेच्या धामधुमीत ही घटना घडत असल्यामुळे तिचा लाभ घेण्यासाठी राजकीय चढाओढ (Maharashtra Politics) लागली आहे. गवळीच्या स्वागतासाठी भाजपने (BJP) पायघड्या टाकल्याचे चित्र आहे. मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या राहुल नार्वेकर यांनी एका सभेत थेट गवळी कुटुंबालाच साकडे घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गवळीसह इतर 11 जणांना 2012 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. चौदा वर्षे शिक्षा भोगली असून, 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी, अशा मागणीची याचिका गवळीने केली होती.
2006च्या माफी धोरणानुसार चौदा वर्षे प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या, वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. 2015 च्या सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र 2006च्या धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही, असे मत न्यायालयाने मांडले होते.
याप्रश्नी सरकारला येत्या दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा लागणार आहे. न्यायालयाने सरकारला दिलेल्या मुदतीत सरकारकडून विरोध मागे घेतला जाईल आणि अरुण गवळीची सुटका होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. गवळी भाजपसोबत जाणार की शिवसेनेला साथ देणार याचे उत्तर सुटकेनंतरच मिळणार आहे.
एका सभेत राहुल नार्वेकर यांनी थेट गवळी कुटुंबालाच साकडे घातले. “मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच (अरुण गवळी) अ.भा.सेच्या कार्यकर्त्यांना प्रेम मिळेल. या परिवारात एक सदस्य आलाय, असं समजा. या बहिणीला (गीता गवळी) महापौर होईपर्यंत या भावाची साथ राहील”, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले आहे.
न्यायालयाने सरकारला दिलेल्या मुदतीत सरकारकडून विरोध मागे घेतला जाईल आणि अरुण गवळीची सुटका होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. गवळी भाजपसोबत जाणार की शिवसेनेला साथ देणार याचे उत्तर सुटकेनंतरच मिळणार आहे.
अरुण गवळीचे शिवसेनेशी चांगले संबंध होते. बाळासाहेब ठाकरे यांनी तर जाहीरपणे तुमचा दाऊद तर आमचा गवळी असे म्हटले होते.
शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर गवळीने स्वतःचा अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला. त्यानंतर अरुण गवळी आमदार झाला.
कन्या गीता गवळीसह त्याची वहिनी वंदना गवळी आणि कार्यकर्ता सुनील घाटे महापालिका निवडणुकीत विजयी झाले.
गीता गवळीची महापालिकेत शिवसेनेशी जवळीक होती, आता भाजपशी जवळीक वाढली आहे.
2004 च्या लोकसभेला मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून गवळी ‘अभासे’कडून उभा होता, त्यावेळी 92 हजार 210 मते मिळाली. चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून 2004 रोजी गवळीने विजय मिळवला होता. त्याला 31 हजार 964 मते मिळाली होती. 2009 च्या निवडणुकीत गवळीचा काँग्रेसच्या मधू चव्हाण यांच्याकडून पराभव झाला.
गीता गवळी यांनी 2014 आणि 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना अनुक्रमे 20 हजार 895 आणि दहा हजार 493 मते मिळाली होती.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.