MP Amol Kolhe News : 'मी घोड्यावर बसलो तर काहींच्या पोटात लय दुखतंय..' खासदार कोल्हे कोणाबद्दल म्हणाले !

Shirur Lok Sabha Constituency पारगाव तर्फे आळे गावात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना घोड्यावर बसवून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.
Dr Amol Kolhe
Dr Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Junnar News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झाली आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात जोरदार प्रचार करण्यास सुरूवात केली आहे.

शिरूर लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात येत असलेल्या जुन्नर विधासभा मतदारसंघातील पारगाव तर्फे आळे या गावात डॉ. कोल्हे यांनी आपला प्रचार केला. त्यावेळी ग्रामस्थांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. निमगाव सावा, साकोरी त्यांनतर पारगाव तर्फे आळे या गावात डॉ.कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू होता यावेळी पारगाव तर्फे आळेच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात फुलांची उधळण करत स्वागत केले. प्रचारासाठी आलेल्या खासदार डॉ.कोल्हे यांना घोड्यावर बसण्याची विनंती ग्रामस्थांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr Amol Kolhe
Sharad Pawar: पवार आडनावापुढेच मतदान करा? अजितदादांना शरद पवारांचे थेट उत्तर; मुलगी ही वंशाचाच नव्हे तर..

ग्रामस्थांनी केलेल्या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार डॉ.कोल्हे घोड्यावर बसले. त्यावेळी यांच्या सोबत शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माऊली खंडागळे, भास्कर गाडगे यांना देखील ग्रामस्थांनी घोड्यावर बसवत ग्रामस्थांनी त्यांची गावातून मिरवणूक काढली. त्यानंतर ग्रामस्थांनी संवाद साधला.'मी जर घोड्यावर बसलो की, काही जणांच्या पोटात लय दुखतंय' अशा शब्दात त्यांनी नाव न घेता विरोधकांना जोरदार टोला लगाविला.

कोणी कितीही टीका करू द्या, लोकसभा निवडणुकीत विकासाची कामे करणाऱ्यांच्या पाठीशी रहा, असे आवाहन यावेळी खासदार कोल्हे यांनी मतदारांना केले. माजी आमदार बाळासाहेब दांगट,सत्यशील शेरकर, पांडुरंग साळवे, आनंद चौघुले, जयंवत घोडके, निवृत्ती साळवे, दत्ता गाडगे, शरद चौधरी, सुरज वाजगे, शरद चौधरी, गुलाब पारखे, संभाजी चव्हाण, राहुल चव्हाण, सुरेखा विटेकर यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान खासदार डॉ. कोल्हे (MP Kolhe) यांनी आश्वासन दिले होते की, ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार आणि तो शब्द खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पूर्ण केला. फेब्रुवारी 2022 मध्ये खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील मानाच्या यात्रेत बैलगाडा घाटात बैलगाड्यासमोर घोडी धरली होती. त्यानंतर आज पुन्हा जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे गावात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना घोड्यावर बसवून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली. दरम्यान, सकाळी निमगाव सावा येथे ग्रामस्थांनी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत स्वागत केले.तसेच साकोरी येथे खासदार डॉ.कोल्हे यांची सभा देखील पार पडली

(Edited by - Chaitanya Machale)

Dr Amol Kolhe
Dhaiyasheel Mohite Patil: वाढदिवशी धैर्यशील मोहिते घेणार मोठा निर्णय; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com