MLC Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन् शिक्षकांची लायकी काढली! ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी!’; श्रीकांत देशपांडे यांचा हल्लाबोल

Amravati Teachers Constituency Election 2026: शिक्षकांनी पैठणी आणि पैशांच्या प्रभावाखाली मतदान केल्याचा दावा देशपांडे यांनी केला. ‘शिक्षकांची कीव करावीशी वाटते,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
Amravati Teachers Constituency Election 2026
Amravati Teachers Constituency Election 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Amravati News: शिक्षकांच्या प्रश्नांवर राजकारण करणाऱ्या नेत्यांची खरी ताकद निवडणुकीतच समोर येते. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

देशपांडे यांना 7 हजार 17 मतांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर त्यांनी शिक्षक मतदारांवरच निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विजयासाठी मतदारांचा कौल महत्त्वाचा असतो; मात्र पराभवानंतर मतदारांच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर त्यातून नेमका कोणाचा राजकीय हिशेब चुकला, असा प्रश्न उपस्थित होतो.

‘पैठणी अन् पैशांवर मतदान’; देशपांडेंचा गंभीर आरोप

पराभवानंतर श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षकांच्या मतदानाच्या पद्धतीवर गंभीर आरोप केले. शिक्षकांनी पैठणी आणि पैशांच्या प्रभावाखाली मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. ‘शिक्षकांची कीव करावीशी वाटते,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

शिक्षकांसारख्या सुशिक्षित घटकाकडून अधिक विचारपूर्वक मतदानाची अपेक्षा असते. मात्र, पैशांच्या आणि भेटवस्तूंच्या प्रभावाखाली मतदान झाल्याचा आरोप देशपांडे यांनी केल्याने या निवडणुकीतील प्रचाराच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘जशी लायकी, तसा प्रतिनिधी’; मतदारांनाच सुनावले

देशपांडे यांच्या प्रतिक्रियेतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे त्यांनी काढलेली थेट लायकी. ‘जशी लायकी तसा त्यांना प्रतिनिधी मिळतो,’ असे म्हणत त्यांनी मतदारांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पराभव स्वीकारताना निवडणुकीतील रणनीती, मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेल्या मर्यादा किंवा प्रचारातील त्रुटींचे विश्लेषण करण्याऐवजी मतदारांनाच सुनावल्याने त्यांच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, शिक्षक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या प्रतिनिधीकडून शिक्षकांचे प्रश्न मांडण्याची आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची अपेक्षा असते. अशा वेळी पराभूत उमेदवाराने मतदारांबद्दल व्यक्त केलेली नाराजी कितपत योग्य, यावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू शकतात.

Amravati Teachers Constituency Election 2026
DA Hike: केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांना दिवाळीची भेट? DA मध्ये 3% वाढीबाबत मोठी अपडेट, पगार किती वाढणार?

‘7 हजार लोक प्रामाणिक राहिले’; उर्वरित मतदारांबाबत खंत

देशपांडे यांनी आपल्याला मतदान करणाऱ्या 7 हजार मतदारांचा उल्लेख करत त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले. ‘7 हजार लोक प्रामाणिक राहिले, बाकी लोकांनी त्यांची मतं विकली,’ अशा आशयाची खंत त्यांनी बोलून दाखवली.

पराभवानंतरही देशपांडे यांनी शिक्षकांना आणि निवडून आलेल्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या प्रतिक्रियेत एका बाजूला शुभेच्छा, तर दुसऱ्या बाजूला मतदारांबद्दलची तीव्र नाराजी दिसून आली.

Amravati Teachers Constituency Election 2026
MLC Election Result 2026: रील्स पाहायचाही संयम नाही; मग बॅलेट पेपरच्या निकालासाठी वाट बघण्याची तयारी आहे का? शिक्षक-पदवीधर मतमोजणीने दाखवला आरसा

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निकालाने देशपांडे यांना राजकीय धक्का दिला असला, तरी त्यांच्या पराभवापेक्षा पराभवानंतरची प्रतिक्रिया अधिक चर्चेत आली आहे. आता शिक्षक मतदार या आरोपांकडे कसे पाहतात आणि देशपांडे यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com