Shirur Loksabha News : शिरूर लोकसभा मतदारसंघाला काम करणारा खासदार हवा आहे, फिल्मी डायलॉगबाजी करणारा अभिनेता नको आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी त्या खासदारांचे नाव जाहीर करावे, असं खुलं आव्हान शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटलांनी दिलंय.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात तगडी लढत झाली होती. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते तसेच जाणते राजकारणी अशी ओळख असलेल्या आढळराव पाटील यांना राजकारणात नवख्या असणाऱ्या अमोल कोल्हे यांनी पराभूत केलं होतं.
आढळराव पाटील यांचा पराभव करत अमोल कोल्हे यांनी विजय खेचून आणली. आता आढळराव पाटील जर अजित पवार (Aijt Pawar) गटासोबत गेले, तर पुन्हा या दोघांमध्ये तगडी लढत होण्याची शक्यता आहे. सध्या डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आढळराव म्हणाले, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसाठी अनेकांचे उंबरे त्यांनी झिजवले. पण, त्यावेळच्या एका खासदारांनी कोल्हेंना विकले तरी पैसे फिटणार नाहीत, या वक्तव्याचा कोल्हे यांनी ऐन लोकसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा वक्तव्य केलंय. यालाच उत्तर देताना महायुतीकडून कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या आढळराव पाटलांनी कोल्हेंना खुलं आव्हान दिलं आहे.
आढळराव पाटील म्हणाले, खासदार अमोल कोल्हे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी त्या खासदारांचे नाव जाहीर करावे. कोल्हे हे फिल्मी डायलॉगबाजी करणारे खासदार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाला काम करणारा खासदार हवा आहे. फिल्मी डायलॉगबाजी करणारा अभिनेता नको आहे.
कोल्हे धाकल्या धन्याचं नाव घेऊन पैसे कमावतात हे त्यांना शोभत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आमच्या जिव्हाळ्याचे आहेत. आमचे आदराचे स्थान आहेत. कोल्हे उगाच बोलून व्यापारासाठी, धंद्यासाठी निवडणुकीसाठी उपयोग करू नका, असा सल्लाही आढळराव पाटील यांनी दिला आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.