Ayush Komkar : 'आय लव्ह यू पप्पा' लिहिलेलं भेटकार्ड घेऊन तुरुंगातून बाप अंत्यसंस्काराला आला! मुलाच्या पार्थिवाला अग्नी देताना ढसाढसा रडला

Andekar-Komkar Gang War : पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर आणि कोमकर गँगमध्ये झालेल्या गँगवॉरमधून गोविंद ऊर्फ आयुष गणेश कोमकर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Ganesh Komkar present on funeral of his son Ayush Komkar
Ganesh Komkar present on funeral of his son Ayush Komkar
Published on
Updated on

Andekar-Komkar Gang War : पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर आणि कोमकर गँगमध्ये झालेल्या गँगवॉरमधून गोविंद ऊर्फ आयुष गणेश कोमकर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या गोविंद कोमकरवर (वय १९) आज वैकुठं स्माशानभूमीत अत्यंसंस्कार पार पडले. यावेळी या गोविंद कोमकरचे वडील आणि वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी जो सध्या नागपूर इथं न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला पोलीस बंदोबस्तात मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पुण्यात आणण्यात आलं.

यावेळी स्मशानभूमीत मुलाचं पार्थिव शरीर पाहून गणेश कोमकर ढसाढसा रडला. माझी चूक नसतानाही माझ्या मुलाची हत्या करण्यात आली, असं तो रडताना सांगत होता. यावेळी त्यानं मुलानं आपल्याला पाठवलेलं एक ग्रिटींग कार्डही सोबत आणलं होतं.

Ganesh Komkar present on funeral of his son Ayush Komkar
Top 10 News: छगन भुजबळ यांना सांगूनच हैदराबाद गॅझेटचा जीआर ते गीता, बायबल, कुराण अन् विकासाचं संविधान! फडणवीसांनी मांडलं व्हिजन डॉक्युमेंट

तीन दिवसांपासून गोविंदचा मृतदेह ससून रुग्णालयात ठेवण्यात आला होता. पॅरोलवर सुटलेले त्याचे वडील गणेश कोमकर अखेर मोठ्या पोलीस बंदोबस्तात आपल्या लेकराच्या अंत्यविधीला सामील झाले. या अंत्यसंस्कारावेळी वातावरण शोकाकुल झालं होतं. वनराज आंदेकर हत्या प्रकरणी गणेश कोमकर गेल्या वर्ष भरापासून नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. आज गणेशवर स्वतःच्या लेकरावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. त्यावेळी गणेशच्या हातातील एक भेटकार्ड हे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होतं.

गणेशच्या हातात एक भेटकार्ड होतं. हे साधं भेटकार्ड नव्हतं, तर त्यांचा लेक आयुषनं स्वतः कारागृहात वडिलांना पाठवलेलं होतं. 'आय लव्ह यू पप्पा' असं त्या कार्डावर आयुषनं लिहिलं होतं. त्याचबरोबर 'नवीन ड्रेस पाठवलाय' असं देखील त्यानं लिहिलं होते. या कार्डासोबत त्यानं काही बालपणीचे फोटो चिकटवले होते. वडिलांच्या प्रेमासाठी आतुर झालेल्या मुलाची ती अखेरची भेट ठरली. माझी काही चूक नव्हती. काही चूक नसताना माझ्या मुलाला एका भोगाव लागलं असं गणेश कोमकर पोलिसांना सांगत होता.

Ganesh Komkar present on funeral of his son Ayush Komkar
Maharashtra Vision Document: गीता, बायबल, कुराण अन् विकासाचं संविधान! फडणवीसांनी मांडलं व्हिजन डॉक्युमेंट; धोरणं काय? जाणून घ्या

लेकाने अखेरच्या भेटीत दिलेले हेच कार्ड गणेशने आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी हृदयाशी घट्ट धरून ठेवलं होतं. गणेशने लेकाची हे शेवटची आठवण म्हणून सर्वांसमोर दाखवली. तुझी शेवटची भेट मी जपून ठेवली आहे, मुलाला सांगण्यासाठीच कदाचित गणेश तो भेटकार्ड घेऊन आला होता. बालपणापासूनचे दोघांचे एकत्रित फोटो त्या कार्डात पाहून उपस्थित नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी हळहळले. कारागृहात असतानाही मुलाने पाठवलेलं प्रेमाचं प्रतीक आज वडिलांच्या हातात होतं, पण मुलगा मात्र नव्हता. वनराजच्या खुनानंतर आंदेकर-कोमकर यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आंदेकर-कोमकर संघर्षात एका निरागस जीवाचा बळी घेतला आहे.

Ganesh Komkar present on funeral of his son Ayush Komkar
Nawab Malik: भावाच्या मदतीला बहिणीची धाव! मलिकांच्या क्लीनचिट विरोधात कोर्टात; यास्मीन वानखेडेंचे पोलिसांवर गंभीर आरोप

गुन्हेगारीचा शेवट गुन्हेगारीनेच होतो हा इतिहास आहे. मागील तीन पिढ्या स्वतः आंदेकर कुटुंब या इतिहासाचा भाग राहिलं आहे. गेली पाच दशकं बाहेर खेळलं जात असलेलं टोळीयुद्ध अखेर त्यांच्या कुटुंबात सुरु झालं आणि सख्ख्या बहिणींकडून भावाची हत्या घडवण्यात आली. त्यानंतर आता आंदेकर टोळीने वनराज आंदेकरच्या सख्ख्या भाच्याचा खून केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com