
Maharashtra Vision Document: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत २०४७ ही संकल्पना मांडली आहे. त्यानुसार केंद्रातील आपलं सरकार काम करत असल्याचंही त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आता राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत आढावा बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी गीता, बायबल, कुराण अन् विकासाचं संविधान प्रमाणं आपलं व्हिजन डॉक्युमेंट असेल असं जाहीर केलं. तसंच त्यासाठी धोरणं तयार करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
आढावा बैठकीत फडणवीस म्हणाले, व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणं धोरण आखू, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करु. गीता, बायबल, कुराण आणि विकासाचे संविधान प्रमाणं व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वे आहेत. या व्हिजननुसार भविष्यातील राज्याची धोरणं तयार करणाचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. पुढील वीस-पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तयार होत असताना आपलं ध्येय आणि त्यांची दिशा निश्चित असणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या आढावा बैठकीत याबाबत जे प्रेझेंटेशन सादर करण्यात आलं ते केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात साध्य होण्यासाठी आपली संपूर्ण क्षमता लावणं आवश्यक असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांच्या गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. त्याचबरोबर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद या व्हिजनमध्ये असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवणं हाच याचा मुख्य उद्देश आहे, असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
या आढावा बैठकीत जलसंपदा, ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक न्याय, उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान, वित्त, आरोग्य आणि पर्यटन या विषयांवरील व्हिजनचं सादरीकरण करण्यात आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.