Anjali Damania: अंजली दमानियांचा वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठा दावा; 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या 'आयजीं'चं नाव घेत म्हणाल्या....

Vaishnavi Hagawane Crime Case : अंजली दमानिया यांनी वैष्णवी हगवणे हत्याप्रकरणात गुरुवारी (ता.22) ट्विट करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. याप्रकरणी एका आयजी अधिकाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
Anjali Damania On Vaishnavi Hagawane case .jpg
Anjali Damania On Vaishnavi Hagawane case .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या आई वडिलांकडे बाळाचा ताबा न देता त्यांच्या कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाणविरोधात आता वारजे पोलिसांनी कठोर पावलं उचलत गुन्हा दाखल केला आहे. तसेच फरार असलेल्या सासरे राजेंद्र हगवणे आणि थोरला दीर सुशील हगवणेच्या मागावर पोलिसांनी वेगानं चक्र फिरवली आहे. याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी खळबळजनक दावा केला आहे.

अंजली दमानिया यांनी वैष्णवी हगवणे हत्याप्रकरणात गुरुवारी(ता.22)ट्विट करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. याप्रकरणी एका आयजी अधिकाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. वैष्णवीच्या पती शशांक हगवणेचे मामा आणि राजेंद्र हगवणेचे मेहुणे पोलीस महानिरीक्षक असून त्यांचाच धाक दाखवून दोन्ही सुनांचा छळ केल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.

अंजली दमानिया ट्विटमध्ये करत म्हणाल्या,मी माहिती घेतली असून या महापोलिस निरीक्षक मामांचा धाक दाखवतच राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) कुटुंबानं दोन्ही सुनेवर अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. पण याच जालिंदर सुपेकर वैष्णवीच्या नवऱ्याचे आयजी मामावर 500 कोटींच्या घोटाळ्याच्या संदर्भात चौकशी सुरू असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

तसेच जळगावमध्ये PSI सादरे यांनी या IG नेच त्रास दिल्याचं सांगत पत्र लिहून आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं,अशी माहिती दमानिया यांनी एका व्हिडिओव्दारे दिली आहे. पण महापोलिस निरीक्षक असलेल्या जालिंदर सुपेकर यांनी अंजली दमानियांच्या आरोपावर स्पष्टीकरण देत त्यांचा आरोप फेटाळून लावला आहे.

Anjali Damania On Vaishnavi Hagawane case .jpg
Beed Police: संतोष देशमुख हत्येनं हादरलेल्या बीडमधून मोठी बातमी; एका रात्रीत तब्बल 606 पोलिसांच्या बदल्या, नवनीत काँवत यांचा दणका

याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी सुपेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, हगवणे कुटुंबीय हे आपले दूरचे नातेवाईक असून,त्यांच्याशी संबंधित प्रकरणात कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच हगवणे कुटुंबासोबत गेल्या कित्येक महिन्यांपासून संवाद नसल्याचंही म्हटलं आहे.

याचवेळी त्यांनी आपल्यालाही दोन मुली असून,अशा गंभीर व निर्घृण कृत्याचं समर्थन कुठलाही बाप करू शकत नसल्याचं सांगितलं आहे. याचवेळी त्यांनी दोषींना त्यांच्या कृत्याची सजा व्हायलाच हवी, असे स्पष्ट मतही पोलीस महानिरीक्षक सुपेकर यांनी व्यक्त केलं आहे.

Anjali Damania On Vaishnavi Hagawane case .jpg
Chhagan Bhujbal : मंत्री होताच छगन भुजबळांनी पहिल्याच सत्कार समारंभात मानले ‘ह्या’ नेत्यांचे खास आभार

अंजली दमानिया म्हणाल्या, तू आमचं काहीही बिघडू शकत नाही, आमचे हात फार मोठे आहेत, अशी धमकी हे हगवणे कुटुंब देत आहे. पण हे कुटुंब अतिशय विकृत मानसिकतेचं असून याप्रकरणात आता सरकारने कारवाई करायला हवी, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com