Saam Exit Poll 2024 : बनसोडे पुन्हा हॅट्ट्रिक करणार की सुलक्षणा शीलवंत धुळ चारणार? 'साम'चा एक्झिट पोल काय सांगतो

Assembley Election Exit Poll 2024 News : यंदा मात्र पिंपरी मतदारसंघांमध्ये दोन राष्ट्रवादी आमने-सामने असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे तर दुसरीकडे माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत निवडणूक रिंगणात आहेत.
Anna Bansode, sulkshna shilvant
Anna Bansode, sulkshna shilvantSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा पराभव करत विजय मिळवला. यंदा मात्र या मतदारसंघांमध्ये दोन राष्ट्रवादी आमने-सामने असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे तर दुसरीकडे माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत निवडणूक रिंगणात आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात 2009 मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या (NCP) ताब्यात होता. या ठिकाणी अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार होते. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन झालं आणि शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी बाजी मारली आणि बनसोडे यांचा पराभव झाला.

Anna Bansode, sulkshna shilvant
Maharashtra Assembly Election 2024 LIVE : अतुल सावे यांनी पैसे वाटले - इम्तियाज जलील सय्यद

2019 मध्ये गौतम चाबुकस्वार यांना आपली आमदारकी राखण्यात अपयश आले. बनसोडे हे पुन्हा एकदा आमदार झाले. यंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी नगरसेविका असलेल्या सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी दिली आहे.

Anna Bansode, sulkshna shilvant
Maharashtra Assembly Election 2024 LIVE : अतुल सावे यांनी पैसे वाटले - इम्तियाज जलील सय्यद

गेल्या वेळी सुलक्षणा शीलवंत यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार होती. मात्र, अखेरच्या वेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. यंदा मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली असून त्यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. बड्या नेत्यांनी देखील त्यांच्यासाठी सभा घेतल्या आहेत. मात्र, साम टीव्हीचा एक्झिट पोल पाहिला तर त्यामध्ये पुन्हा एकदा अण्णा बनसोडे हे आमदार होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अण्णा बनसोडे यांनी देखील विजयाचा गुलाल उधळणार ? असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

Anna Bansode, sulkshna shilvant
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील सत्तेची चावी असणार अपक्षांच्या हाती; सोलापुरातील 'या' उमेदवारांवर असणार 'वॉच'

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे बदली आहेत. काँग्रेसला कडवा विरोध करणाऱ्या शिवसेनेत दोन गट पडले आहेत.

यामध्ये एक गट भाजपसोबत आहे, तर दुसरा गट काँग्रेससोबत महाविकास आघाडीत निवडणूक लढवत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली असून दोन गट झालेत. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरण आणि गणित बदलली असून ही ऐनवेळी कोणाच्याही पथ्यावरती पडू शकता अशी शक्यता आहे त्यामुळे ऐनवेळी बाजी कोणाच्याही बाजूने फिरण्याची शक्यता आहे.

Anna Bansode, sulkshna shilvant
Maharashtra Highest Voting : मतदारांनी सगळी गणितं चुकवली! 30 वर्षांनी पहिल्यांदाच मतांचा विक्रमी टक्का

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com