Ashatai Buchke : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके यांचे निधन, जुन्नरच्या राजकारणाला मोठा धक्का

Ashatai Buchke Passes Away : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके यांचे निधन झाले. आक्रमक महिला नेतृत्व म्हणून त्यांनी जुन्नरच्या राजकारणात ओळख होती.
Ashatai Buchke Passes Away
Ashatai Buchke Passes Awaysarkarnama
Published on
Updated on

Pune News : जुन्नरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आक्रमक महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशाताई बुचके यांचे निधन झाले. त्यांनी अनेक वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना जुन्नर तालुक्यात आपला स्वतंत्र राजकीय ठसा उमटवला होता. ग्रामीण भागातील प्रश्न, विकासकामे आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर त्या आक्रमकपणे भूमिका मांडत असत. त्यांच्या लढाऊ आणि स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्या जुन्नरच्या राजकारणात विशेष चर्चेत राहिल्या.

शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर त्यांनी जुन्नरच्या राजकारणात महिला नेतृत्व म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता.

2014 मध्ये त्यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतरही त्यांनी तालुक्यातील राजकारणात सक्रिय भूमिका कायम ठेवली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवला.

2026 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली होती. तिरंगी लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आशाताई बुचके यांच्या निधनाने जुन्नरच्या राजकारणातील एक आक्रमक आणि लढाऊ महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Ashatai Buchke Passes Away
Maharashtra Politics : 'कंपन्यांना राष्ट्रवादीकडून त्रास, तटकरे ब्लॅकमेल करतायेत'; शिंदेंच्या आमदाराच्या खळबजनक आरोपानं राजकारण पुन्हा तापलं

जुन्नर तालुक्यात असं नेतृत्व होणार नाही

माजी खासदार आढळराव पाटील यांनी आशाताई बुचकेंना श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, राजकारणातील माझ्या सुवर्णकाळात ताईंची मोलाची साथ मला लाभली. आम्ही बऱ्याचवेळा भांडलो, रुसलो परंतु ते फक्त तेवढ्यापुरतचं असायचं. जुन्नर तालुक्यात असं नेतृत्व होणे नाही.ताई

Ashatai Buchke Passes Away
मोठी बातमी! ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. हेमराज शाह यांचे 84 व्या वर्षी निधन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com