Rahul Kalate News: राहुल कलाटेंनी पुन्हा विधानसभा लढवली, तर चिंचवडला काय होणार?

Chinchwad VidhanSabha News : तीनवेळा तेथून लढलेले राहुल कलाटे यांनी आगामी विधानसभेचे आपले पत्ते ओपन केले नसले, तरी ते पुन्हा चौथ्यांदा लढणार आहेत, असे त्यांच्या निकटच्या वर्तुळातून सांगण्यात आले.
Rahul Kalate
Rahul KalateSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर आता इच्छुक मंडळींना अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी महायुतीचा कस लागणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने सत्ता काबीज करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. उद्योगनगरीतील चिंचवड मतदारसंघही त्याला अपवाद नाही.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीत भाजपच्या उमेदवारीसाठी जगताप कुटुंबात रस्सीखेच सुरु झाली आहे. विद्यमान आमदार अश्विनी जगताप (Ashvini Jagtap) पुन्हा लढणार आहेत. तर,त्यांचे दीर आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांनीही चिंचवडमधून लढणार असल्याचा दावा केला आहे. तर, महायुतीतील राष्ट्रवादीचे नाना काटेही इच्छूक आहेत. दरम्यान, तीनवेळा तेथून लढलेले राहुल कलाटे यांनी आगामी विधानसभेचे पत्ते ओपन केले नसले, तरी ते पुन्हा चौथ्यांदा लढणार आहेत, असे त्यांच्या निकटच्या वर्तुळातून सांगण्यात आले.

कलाटे पुन्हा लढले, तर चिंचवडला 2024 ला पुन्हा मोठा उलटफेर होणार आहेत. गेल्यावर्षीच्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी करीत ते अपक्ष म्हणून लढले. त्यामुळे आघाडीच्या हाता तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. कारण कलाटेंनी 44 हजार 112 मते घेतली. तर, विजयी उमेदवार भाजपच्या अश्विनी जगताप या 36 हजार 168 मतांनी विजयी झाल्या. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Ncp) नाना काटे यांनी 99 हजार 435 मते घेतली होती. त्यामुळे 2024 ला कलाटे पुन्हा रिंगणात उतरले, तर कोणाला धक्का देणार किंवा इजा, बिजा, तिजा झाल्याने स्वत आमदार होणार याची चर्चा आताच रंगली आहे.

अपक्ष म्हणून 2023 आणि 2019 ला लढल्याचा मोठा फटका कलाटेंना बसला आहे. त्यामुळे पुन्हा ते अपक्ष म्हणून रिंगणात यावेळी उतरणार नाहीत, असे त्यांचे निवडणुकीत काम पाहणाऱ्या एका माजी नगरसेवकाने सांगितले. ते यावेळी तुतारी फुंकण्याची दाट शक्यता आहे. तसं झालं, तर त्यांना पक्षाचे बॅकिंग भेटून त्यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. कारण चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनामुळे गेल्यावर्षीच्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीची लाट असूनही त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या फक्त 36 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.

Rahul Kalate
Nilesh Lanke Meet Gaja Marne Video : नीलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, खासदार होताच गुंड गजा मारणेच्या दारी!

त्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने 99 हजार मते घेतली होती, ही बाब, जर ते यावेळी आघाडीकडून लढले, तर त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आघाडीने महायुतीला चारीमुंड्या चित केले. ही लाट विधानसभेपर्यंत टिकण्याची शक्यता असून त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो.

कलाटेंना शिवसेनेची दारे बंद

शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी केल्याने कलाटेंना शिवसेनेची दारे बंद झाली आहेत. भाजप, कॉंग्रेस आणि अजित पवार गटात ते जाणार नाहीत. परिणामी शरद पवार राष्ट्रवादीत ते जातील,असा तर्क आहे. गेल्यावर्षीच्या पोटनिवडणुकीत त्यांनी त्यावेळी एकसंध असलेल्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, त्यात अपयश आल्याने ते अपक्ष म्हणून लढले अन सलग तिसऱ्या निवडणुकीत पडले. राष्ट्रवादीच्या अपयशाचे धनी झाले. या सर्व चुकांमधून बोध घेऊन पुन्हा लढण्याचा आणि अखेर चिंचवडचा आमदार होण्याच्या तयारीला ते व त्यांचे सहकारी आतापासून लागले आहेत. पण, त्याची वाच्यता न करण्याची खबरदारी त्यांनी घेतली आहे.

Rahul Kalate
Rajabhau Waje News : राजाभाऊ वाजे ॲक्टिव्ह; म्हणाले, 'जरांगे पाटलांचे उपोषण सोडवा'

तीन विधानसभा लढल्याचा मोठा अनुभव

तीन विधानसभा लढल्याचा मोठा अनुभव कलाटेंकडे आहे. गेल्यावर्षीची पोटनिवडणूकच नाही, तर 2019 ची विधानसभा ते सर्व विरोधी पक्षांच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून लढले होते. त्यावेळी त्यांनी तब्बल 1,12,225 मते घेतली होती. तर,भाजपचे (Bjp) लक्ष्मण जगताप यांचा फक्त 38 हजार 498 मतांनी विजय झाला होता. 2014 ला शिवसेनेकडून लढताना त्यांनी दुसऱ्या नंबरची मते (63,489) घेतली होती. त्यावेळीही लक्ष्मण जगतापांनीच त्यांचा 60 हजार 297 मतांनी पराभव केला होता. 2024 ला पुन्हा जगतापच त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे. जगताप कुटुंबातील दीर-भावजयीच्या भांडणात भाजप तिसराच उमेदवारही देऊ शकते.

Rahul Kalate
Rahul Kalate : 'हम भी है रेस में!'; अश्विनीवहिनी अन् शंकरशेठ यांना राहुल कलाटे देणार चॅलेंज...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com