Siddharth Dhende : महायुतीमध्ये सन्मान मिळत नाही, रामदास आठवलेंच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा

Siddharth Dhende Resignation RPI: गेल्‍या दहा वर्षांपासून भाजपासह महायुतीला आरपीआयने राजकीय समर्थन दिले आहे. मात्र महायुतीकडून पक्षाला केवळ गृहित धरण्याचे काम केले जात आहे, असे सिद्धार्थ धेंडे यांनी म्हटले आहे
Siddharth dhende ramdas Athawale
Siddharth dhende ramdas Athawalesarkarnama
Published on
Updated on

Pune News: महायुतीच्या जागा वाटपामध्ये आरपीआयला देखील काही जागा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र आरपीआयला जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीमध्ये आरपीआयला सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशी खंत व्यक्त करत पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपल्‍या आरपीआय पक्ष सदस्‍यत्‍त्‍वाचा राजीनामा दिला आहे. आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्त करण्यात आला आहे.

डॉ.धेंडे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिलेल्‍या पत्रात नमूद केले आहे की, मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्‍हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षामध्ये गेली 27 वर्ष कार्य करत आहे. आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करणे.

तसेच राजकीय पदाचा उपयोग करून समाजाला न्याय देण्याच्‍या कामात पुढाकार घेतला आहे. पक्षाच्‍या धोरणानुसार विविध राजकीय भूमिकेला नेहमीच समर्थन दिलेले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून आरपीआयला महायुतीकडून सन्मानाची वागणूक दिली जात नसल्‍याची खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

Siddharth dhende ramdas Athawale
Pune BJP : पुणे जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात भाजपच्या दोन बंडखोरांनी केलेत अपक्ष अर्ज दाखल!

लोकसभा जागा न दिल्याने नाराज

नुकत्‍याचा पार पडलेल्‍या लोकसभा निवडणूकीतही ही जागा महायुतीने आपल्या पक्षाला दिलेली नाही. तसेच या विधानसभेमध्ये पक्षाला स्वतंत्र निवडणूक चिन्ह असून देखील आपले प्रतिनिधीत्व द्यायला महायुती मधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी हे देखील तयार नाहीत असे दिसत आहे.

सर्व आंबेडकरी जनतेमध्ये या विषयावर तीव्र नाराजीचा सूर आहे. प्रसार माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. पुणे शहरामधील अनेक कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आहे. त्‍यानंतर मी पक्ष सदस्त्वाचा त्याग करत आहे. माझा राजीनामा मंजूर करावा, असे पत्र डॉ. धेंडे यांनी केंद्रीय मंत्री आठवले यांना लिहिले आहे.

आंबेडकर अनुयायी दुखावले

गेल्‍या दहा वर्षांपासून भाजपासह महायुतीला आरपीआयने राजकीय समर्थन दिले आहे. मात्र महायुतीकडून पक्षाला केवळ गृहित धरण्याचे काम केले जात आहे. सन्‍मानाची वागणूक दिली जात नाही. यामुळे आंबेडकरी अनुयायी दुखावले आहेत. नाराजी व्‍यक्‍त करत आहेत. त्‍यांचा लोकप्रतिनिधी या नात्‍याने मी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्‍याकडे पाठविला आहे, असे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.

Siddharth dhende ramdas Athawale
Aurangabad Central Constituency: तनवाणींच्या माघारीनंतर जिल्हाप्रमुख पदही गेले; `मध्य` मध्ये बाळासाहेब थोरातांना उमेदवारी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com