Pune Police : गुंडांची हिंमत वाढली, पुण्यात पोलिसावरच कोयत्याने हल्ला; गुन्हे शाखेचा कर्मचारी जखमी

Attack On Police Constable Amol Katkar : पुणे शहरात हिंमत वाढली असल्याची चर्चा आहे.गुंडांनी थेट पोलिस हवालदारावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Amol Katkar
Amol Katkarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरात वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली असतानाच, आता पोलिसांवरच हल्ले होण्याच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कोयता गँग टोळी युद्धमुळे फक्त सामान्य नागरिकच नाही तर पोलीसही आता सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रविवारी मध्यरात्री डेक्कन परिसरातील लॉ कॉलेज रोडवर गुन्हे शाखा युनिट-३ मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार अमोल काटकर यांच्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल काटकर हे शनिवारी रात्री आपली ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी निघाले होते. रात्री १ च्या सुमारास लॉ कॉलेज रोडवर दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.या हल्ल्यात काटकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला रस्त्यावरील ‘कट मारणे’ या किरकोळ वादातून झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Amol Katkar
Nilesh Ghaywal Video : निलेश घायवळच्या घरावर पुन्हा छापेमारी, मराठवाडा कनेक्शन उघड, जमिनीची कागपत्र अन् बंदूकीच्या गोळ्या...

घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

या घटनेमुळे पुणे शहरातील पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलीस खात्यातील सूत्रांनी सांगितले.

Amol Katkar
Ahilyanagar News: 'आम्ही आयुष्यात कधीच एवढं पाणी पाहिलं नव्हतं....'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com