पुणे : दलित वस्तीमधील काम मंजूर करण्यासाठी शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीने पुणे जिल्हा परिषदेचे (Pune ZP) समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरंटीवार (Praveen Korantiwar) यांना शुक्रवारी (ता. २६ नोव्हेंबर) लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाज कल्याण अधिकारी कोरंटीवार यांनी पैसे घेण्यास संबंधित व्यक्तीस नकार देत कार्यालयातून बाहेर जाणे पसंत केले. पण, संबंधित व्यक्तीने सोबत आणलेले सर्व पैसे कोरंटीवार यांच्या कार्यालयात फेकले, त्यामुळे त्यांच्या कार्यालयात नोटांचा अक्षरशः पाऊस पडला होता. (Attempt to bribe Pune Social Welfare Officer Praveen Korantiwar)
दलित वस्तीसंदर्भातील एक काम मंजूर करून घेण्यासाठी शिरूर तालुक्यातील एक गृहस्थ आज समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या दालनात आले होते. काम मंजूर करण्याच्या मोबदल्यात त्याने समाज कल्याण अधिकारी कोरंटीवार यांना लाच देऊ करण्याचा प्रयत्न संबंधित व्यक्तीने केला. मात्र, पैस घेण्यास नकार देत कोरंटीवार हे दालनातून बाहेर आले हेाते. त्याचवेळी त्या व्यक्तीने जवळच्या नोटाचा संपूर्ण कार्यालयात उधळल्या. या प्रकरणाची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
घडलेल्या घटनेबाबात समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरंटीवार यांनी सांगितले की, एक व्यक्ती सकाळी माझ्या कार्यालयामध्ये दलित वस्तीचे काम मंजूर करून घेण्यासाठी आली होती. काम मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात त्या व्यक्तीने मला लाच देण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना ‘मी तुमचे काम करून देतो, तुम्ही जावा,’ असा सल्ला दिला. मात्र, संबंधित व्यक्तीने सोबत आणलेल्या नोटा माझ्या कार्यालयात उधळल्या.
दरम्यान, लाच घेणे जसा गुन्हा आहे, तसाच लाच देणेही गुन्हा आहे. त्यामुळे कामाच्या मोबदल्यात समाज कल्याण अधिकारी कोरंटीवार यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संबंधित व्यक्ती काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.