Ganesh Bidkar Attack : धक्कादायक! गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पाच जणांच्या विरोधात गुन्हा; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

PMC Election BJP Ganesh Bidkar Police : गणेश बीडकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Ganesh Bidkar
Ganesh BidkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम जोरदार सुरू असताना प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, के.ई.एम. हॉस्पिटल) मधील भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 10 जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी मंगळवार पेठेतील सदानंद नगर परिसरात घडली. आदित्य दीपक कांबळे (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र भाजपचे उमेदवार निलेश आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थांबले होते. याचवेळी भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्तेही शुभेच्छा देण्यासाठी आल्याने परिसरात गर्दी झाली.

या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी प्रभाग क्रमांक २४ मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. विशेषतः आरोपी सागर कांबळे याने गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे.

Ganesh Bidkar
Imran Pratapgarhi AIMIM criticism : 'AIMIM'मुळे मुस्लिमांचे नेतृत्व कमजोर; इम्रान प्रतापगढी यांनी ओवैसींच्या 'पंतग'चा 'मांजा' कोणाचा, सांगून टाकलं!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची नावे निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे अशी आहेत. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

Ganesh Bidkar
ZP Election Update : जिल्हा परिषद निवडणूक तयारीला मोठा धक्का, सुप्रीम कोर्टात आयोगाचा अर्ज; मुदतवाढ मिळणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com