Khed Politics : निवडणूक जाहीर होताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, मोठ्या नेत्याने सोडली साथ!

Atul Deshmukh NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अतुल देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उद्या धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
Atul Deshmukh to join Shiv Sena after parting ways with NCP chief Sharad Pawar — major twist in Khed politics.
Atul Deshmukh to join Shiv Sena after parting ways with NCP chief Sharad Pawar — major twist in Khed politics.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची पहिल्या टप्प्यातील नगरपालिका, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे.निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेत पक्षाला रामराम केला.

अतुल देशमुख हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा उद्या (६ नोव्हेंबर) चाकण येथे होणार आहे. या पक्षप्रवेशामुळे उत्तर पुण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

अतुल देशमुख यांची खेड तालुक्यात मजबूत पकड असून, स्थानिक पातळीवर हजारो कार्यकर्ते आणि जनसंपर्क यामुळे ते राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. एक वर्षापूर्वी भाजपचा राजीनामा देत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आले होते. मात्र आता पक्षांतर्गत मतभेद आणि स्थानिक राजकीय समीकरणांमुळे त्यांनी एका वर्षानंतर शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

त्यांच्या सोबत चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगरपालिकांतील नगरसेवक, पंचायत समिती सदस्यांसह कार्यकर्तेही धनुष्यबाण हाती घेणार आहेत. यामुळे शिंदे शिवसेनेला उत्तर पुण्यात मोठे बळ मिळणार आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वीच खिंडार पडले आहे.

Atul Deshmukh to join Shiv Sena after parting ways with NCP chief Sharad Pawar — major twist in Khed politics.
Mumbai Politics : 'महाराष्ट्र से बिहार तक...', उत्तर भारतीय सेनेने ठाकरे बंधूंना डिवचलं, थेट मातोश्रीबाहेर बॅनरबाजी करत परप्रांतियांना दिला सावधानतेचा इशारा

चाकण येथील भाग्यश्री मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटातील वरिष्ठ नेते, आमदार आणि जिल्हा पदाधिकारी हजेरी लावणार आहेत.

पशरद पवारांच्या राष्ट्रवादीला सलग धक्के

निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकापाठोपाठ धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यासह राज्यभरात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि दिग्गज नेते पक्ष सोडून जात आहेत. यापूर्वी ठाण्यातील सात माजी राष्ट्रवादी नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता, तर आता अतुल देशमुखांसारख्या स्थानिक नेत्याचा निर्णय पवारांसाठी मोठा धक्का आहे.

Atul Deshmukh to join Shiv Sena after parting ways with NCP chief Sharad Pawar — major twist in Khed politics.
Child Abuse Case : संतापजनक! शिक्षकाकडून 13 वर्षांपासून लैंगिक शोषण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com