Avinash Bhosale Bail: ...तब्बल 800 पेक्षा अधिक दिवसांनी अविनाश भोसले तुरुंगाबाहेर येणार!

Mumbai High Court : येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (डीएचएफएल) गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयनं अविनाश भोसलेंना अटक केली होती.ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती.
Avinash Bhosale
Avinash BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Pūne News: सीबीआयने बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी 26 मे 2022 सीबीआयने अटक केली होती. तब्बल दोन वर्षांनंतर अखेर भोसलेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ईडीने आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी जामीन मंजूर केला आहे.सीबीआयने 26 मे 2022 रोजी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली होती.त्यानंतर,याच प्रकरणी ईडीने भोसले यांना 28 जून 2022 ला अटक केली होती.

येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (डीएचएफएल) गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयनं अविनाश भोसलेंना अटक केली होती. ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. 2022 पासून भोसले तुरुंगातच होते.अविनाश भोसले यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करण्यात आली होती.

सीबीआयने नोंदवलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयानेच याआधीच त्यांना जामीन मंजूर केला होता.मात्र, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला नव्हता.आता मुंबई उच्च न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यातही जामीन मंजूर केला आहे.राजकीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या भोसले यांचा आता तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Avinash Bhosale
Sangeeta Thombare: खळबळजनक!भाजपच्या माजी महिला आमदाराच्या गाडीवर हल्ला; केजमध्ये काय घडलं?

उच्च न्यायालयाने अविनाश भोसले यांना बुधवारी (ता.28) मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला.यावेळी न्यायालयाने ईडीला मोठा दणका देतानाच सक्तवसुली संचलनालयाकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात ते दोषी असल्याचे पुराव्यांतून दिसून येत नसल्याचे म्हटलं आहे.

न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी भोसले यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात ते दोषी नसल्याचे अनेक कारणं असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय त्यांना अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये यापूर्वीच जामीन मंजूर झाल्याचेही न्यायमूर्तींनी जामीन मंजूर करताना नमूद केले. तसेच परवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तपासयंत्रणांना सहकार्य करण्याचेही त्यांनी सांंगितले आहे.

Avinash Bhosale
CBI on Kejriwal News : केजरीवाल अन् गोव्यातील 'APP'च्या उमेदवारांबाबत 'CBI'चा मोठा दावा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com