Pune Crime : आयुष कोमकर खून प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; आंदेकर फॅमिलीतील आणखी एकाला पोलिसांनी उचललं; कोर्टात खळबळजनक दावे

Bandu Andekar family member arrested: बंडू आंदेकर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "पोलिसांनी मला कृष्णाला कोर्टात हजर न केल्यास एन्काऊंटर करण्याची धमकी दिली. माझ्या घरातील कोण कोण नगरसेवक आहेत आणि कोण निवडणुकीला उभे राहणार आहेत, याची चौकशी केली असं आंदेकर कोर्टात म्हणाले.
Bandu Andekar Ayush Komkar murder case
Bandu Andekar,Ayush Komkar murder Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे शहरातील बहुचर्चित आयुष कोमकर खून प्रकरणात पोलिसांनी सोनाली वनराज आंदेकर यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या अटकेला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या (PMC Election) पार्श्वभूमीवर काही अटक करण्यात आले असल्याचा आरोप आरोपीच्या वकिलांनी केला आहे

आयुष कोमकर खून प्रकरणाबाबत गुरुवारी (ता.18) कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील यांनी युक्तिवाद करताना वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच आयुषचा खून करण्यात आल्याची शक्यता असून आणखी पुढे असं काही करणार आहेत का किंवा त्याच अनुषंगाने इतर अँगल्सचा तपास करायचा आहे,असा युक्तिवाद केला.

28 तारखेला आरोपी वानवडीत विशिष्ट ठिकाणी जमले होते. व्हॉट्सॲप चॅटमध्ये तसेच आढळून आले आहेत. आरोपी मोबाईल घरी ठेवून एकमेकांना भेटायचे. तसेच फायरिंगची प्रॅक्टिस कुठे केली, याचा शोध घायचा असल्यानं आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली.

यावर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितले की, त्यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले असून, कोणतीही रिकवरी बाकी नाही. तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणासाठी पोलिस कोठडीची गरज नाही.

Bandu Andekar Ayush Komkar murder case
Shiv Sena Politics : शिंदेंची शिवसेना ठाकरेंचा उरलासुरला पक्षही फोडणार; कोल्हापुरात लवकरच मोठा धमाका...

सोनाली आंदेकर यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करत, त्यांना केवळ पुरवणी जबाबावरून अटक केल्याचे वकिलांनी म्हटले. याशिवाय, हे प्रकरण गँगवॉर नसून, जाणीवपूर्वक संपूर्ण कुटुंबाला गोवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवम आणि सोनाली हे मनपा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने त्यांना टार्गेट केले जात असल्याचा दावाही वकिलांनी केला.

बंडू आंदेकर यांचा गंभीर आरोप:

आंदेकर कुटुंबातील बंडू आंदेकर (Bandu Aandekar) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, "पोलिसांनी मला कृष्णाला कोर्टात हजर न केल्यास एन्काऊंटर करण्याची धमकी दिली. माझ्या घरातील कोण कोण नगरसेवक आहेत आणि कोण निवडणुकीला उभे राहणार आहेत, याची चौकशी केली. मी लक्ष्मी, सोनाली आणि शिवम यांची नावे सांगितल्यानंतर आज दुपारी माझी सून सोनालीला अटक झाली." या आरोपांमुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.

Bandu Andekar Ayush Komkar murder case
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; हैदराबाद गॅझेटवरील टांगती तलवार दूर; मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

न्यायालयाचा निर्णय:

न्यायाधीशांनी तिन्ही महिला आरोपींना पोलिस कोठडीऐवजी MCR मंजूर केली, कारण त्यांचा कटाशी संबंध असल्याचे पुरावे अद्याप मिळाले नाहीत. मात्र, पुरुष आरोपींचे क्रिमिनल रेकॉर्ड लक्षात घेता, त्यांचा कटाशी संबंध आणि इतर पुरावे शोधण्यासाठी 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com