
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी(ता.1) रात्री हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून आणि गोळ्या घालून हत्या केली. यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पुण्यात गँगवारचा भडका उडण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत संशयित आरोपींना अटक केली होती.
या हत्येप्रकरणी वनराज आंदेकर (Vanraj Aandekar) यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांच्या पतींचा हात असल्याचे समोर आले होते. पण त्यानंतर आता पोलिसांनी वनराज यांच्या हत्येप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. 13 जणांना पोलिसांनी ताम्हिणी घाटातून अटक केली आहे.
पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (ता.3) सायंकाळी ताम्हिणी घाटातून 13 जणांना मुसक्या आवळल्या.हे सर्वजण जेवण्यासाठी हे ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते. जेवण उरकल्यानंतर घाटातून पुढे पळून जाण्याच्या तयारीत होते. पण पोलिसांनी सिनेस्टाइलने आधीच या सगळ्या आरोपींना ताब्यात घेतलं.
वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. त्यामुळे पोलिसांसमोर (Police) आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचं आव्हान होतं. त्यासाठी पुणे पोलिसांची अनेक पथके आरोपींच्या मागावर होते. अखेर पोलिसांना मंगळवारी या हत्येतील आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले.
माजी नगरसेवक व हत्या झालेल्या वनराज यांचे वडील सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.प्राथमिक अंदाज व्यक्त करताना पोलिसांनी पूर्ववैमनस्य,कौटुंबिक कलह,संपत्तीचा वाद यावरुन वनराज यांचा काटा काढल्याचं समोर आले होते.
पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या प्रकरणी माहिती देताना वनराज आंदेकर यांच्या दोन बहिणी आणि त्यांच्या पतींच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं होतं. तसेच वनराज आंदेकर यांच्या खूनाचा प्लॅन दीड ते दोन महिन्यांपासून रचला जात होता. अटक करण्यात आलेल्या तीन जणांमधील सोम्या गायकवाड हा वनराज आंदेकर यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार आहे. तर गायकवाड हा पूर्वी आंदेकर टोळीतच सक्रिय होता.
वनराज आंदेकर यांचे नाना पेटीतील डोके तालीम येथे घर आहे.रविवारी रात्री साठेआठच्या दरम्यान वनराज घराच्या परिसरात उभे असताना एक टोळके दुचाकीवरून तिथे आले.त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला.
हल्ल्यानंतर वनराज यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र,उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.