Babasaheb Ambedkar RSS : 'बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात संघाच्या शिक्षा वर्गास दोनदा भेट दिली...', भाजप नेत्याच्या दावा, गवईंचाही संदर्भ दिला

BJP Keshav Upadhye RSS : बाबासाहेब आंबेडकर हे हिंदुत्वाच्या विरोधात होते ही मांडणीच मुळात चूक आहे, असे मत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.
Babasaheb Ambedkar RSS
Babasaheb Ambedkar RSS sarkarnama
Published on
Updated on

Keshav Upadhye News : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी भाजप केलेल्या दाव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकदा नव्हे तर दोनदा पुण्यात संघाच्या शिक्षा वर्गास भेट दिल्याचे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

उपाध्ये यांनी फेसबूकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'बाबासाहेबांचा संघाशी संवाद होताच. दत्तोपंत ठेंगडी, मोरोपंत पिंगळे यांच्याशी त्यांचा नित्य संपर्क होता. १९३५ व १९३९ मध्ये पुणे येथे झालेल्या संघ शिक्षा वर्गास त्यांनी भेटही दिली होती.'

१९५४ मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी भंडारा लोकसभा निवडणूक लढविली होती, त्यात संघ स्वयसेवकांनी बाबासाहेबांचा प्रचार केला होता. काँग्रेसने मात्र त्यांना पराभूत केले हा इतिहास आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Babasaheb Ambedkar RSS
Dr. Babasaheb Ambedkar: बौद्ध धर्मच का स्वीकारला? आंबेडकरांनी सांगितले होते कारण...

या देशातील पुरोगामी वर्गाने नेहमी हीच मांडणी केली की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाला संघाने, हिंदुत्ववादी शक्तीनी नेहमीच विरोध केला. मुळात ही मांडणीच चूक आहे. बाबासाहेबांनी भारतीय मूल्यांचे संवर्धन केले, ही वस्तुस्थिती आहे. संघदेखील हेच काम करीत आला आहे.

'मध्यतंरी अमरावतीमध्ये श्रीमती कमलाताई गवई या संघाच्या व्यासपीठावर जाणार म्हणून मोठा गदारोळ निर्माण केला गेला. संघ व आंबेडकरी विचार हे विरोधी असल्याने त्या संघाच्या व्यासपीठावर जाणार यावर घमासान चर्चा झाली. पण प्रत्यक्षात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार आणि संघ विचार यात खरच अंतर आहे?…याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. मार्ग वेगळे, मात्र दिशा एकच होती.', असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Babasaheb Ambedkar RSS
Mahayuti Politics : 'महायुती न झाल्यास मुंबईचा महापौर आमचाच...'; शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com