Mahayuti Politics : 'महायुती न झाल्यास मुंबईचा महापौर आमचाच...'; शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

Shivsena vs BJP : 'मंगलप्रभात लोढा यांचे हे वैयक्तिक मत असू शकतं. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो. आम्ही क्रांती केल्यामुळं भाजप आणि महायुती सरकारमध्ये आहे. सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे 100 टक्के खोटं आहे.'
Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 06 Dec : महायुतीत मागील काही दिवसांपासून प्रचंड धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे.

एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून सुरू झालेला वाद आणि त्यानंतर एकमेकांविरोधात लढवलेल्या स्थानिकच्या निवडणुका. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दुरावा वाढला असातनाच आता शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने थेट मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर दावा केला आहे.

महायुती झाली नाही तर मुंबईवर आमचाच महापौर असेल, असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. ते म्हणाले, 'मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे नगर पालिकेत झाले त्याचा फटका आम्हाला बसला आणि फायदा महाविकास आघाडीला होणार आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Dipali Patil Death : नृत्यांगना दीपाली पाटीलने लॉजवर संपवले जीवन, भाजपच्या माजी नगरसेवकाचे नाव समोर; रोहित पवारांच्या ट्विटने ट्विस्ट

याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेतील. जास्त जागा भाजप लढणार असल्याने ते ठामपणे सांगू शकतात की महापौर आमचा होईल. मात्र, जर महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करु. तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

शिवाय त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप-शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे युती न झाल्यास आमचाच महापौर होणार, असं वक्तव्य शिंदेंच्या नेत्याने केल्यामुळे शिवसेना एकप्रकारे भाजपला इशाराच देत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Dr. Babasaheb Ambedkar : राजेंद्र प्रसाद यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र अन् आंबेडकर संविधानसभेत परतले, काय होतं पत्रात?

दरम्यान, महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात असं वक्तव्य भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले की, 'मंगलप्रभात लोढा यांचे हे वैयक्तिक मत असू शकतं. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो. आम्ही क्रांती केल्यामुळं भाजप आणि महायुती सरकारमध्ये आहे. सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे 100 टक्के खोटं आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com