Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांच्या वरळीतील फसलेल्या सभेला जबाबदार कोण?

Aditya Thackeray News : मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात खुर्च्या खाली असल्यामुळे त्याची एकच चर्चा रंगली आहे
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात सभा झाली. या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात खुर्च्या खाली असल्यामुळे त्याची एकच चर्चा रंगली आहे. मात्र, या फसलेल्या सभेला जबाबदार कोण असा सवाल विचारला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंगळवारी कोळी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मात्र, चर्चा झाली ती सभेमध्ये गर्दी नसल्याची, त्यावरुन राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा झाली. तसेच विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सभेच्या आयोजकांनी पुरेशी काळजी न घेल्याचा त्यावरुन आता सवाल उपस्थित होत आहेत.

Eknath Shinde News
Balasaheb Thorat News : पटोलेंना आरोपी करणारे थोरात 'या' प्रश्नावर का बोलत नाहीत...

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत वरळीतून उभे राहण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर शिंदे यांची सभा वरळीमध्ये झाली. मात्र, गर्दी न जमल्यामुळे ती सभा फसल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सरकार आल्यापासून अत्यंत ताकदीने काम करत आहेत. त्यांनी विकास कामाचा धडाका लावला आहे. परंतु सभेचीच चर्चा अधिक होत आहे. त्यामुळे सभेच्या आयोजकांनी ही खबरदारी घ्यायला हवी होती.

परंतु आयोजकांनी खबरदारी घेतली नाही. त्यामुळे सभेची चर्चा अधिक झाली. 'मातोश्री'वर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या भोवती एक कडे आहे. त्यामुळे आपण बाहेर पडलो, असा आरोप शिंदे गटातील आमदार करतात. मात्र, आता शिंदेच्या भोवतीही एक कडे तयार झाले आहे. आणि तेच ते नेते शिंदे यांच्यासोबत कायम दिसतात.

Eknath Shinde News
Shivsena : शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयाचा निकालच चर्चांना विराम लावेल !

राज्यभरात शिंदे यांचा दौरा कुठेही असला तरी त्यांच्याभोवती तेच ते चेहरे दिसतात. यामुळे ठाकरे यांच्या प्रमाणेच शिंदे यांच्याभोवतीही कडे तयार होऊ लागले आहे का? असा सवाल केला जात आहे. त्याच त्या नेत्यांवर सभेची जबाबदारी असल्यामुळे सभा फसल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे यांच्या भोवती असलेल्या नेत्यांवरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com