Sharad Pawar oath ceremony : शरद पवार आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार तर, पार्थ पवार 'या' तारखेला...

Sharad Pawar Rajya Sabha Swearing : आज पवार कुटुंबात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे शरद पवार राज्यसभा खासदारकीची शपथ घेतील. तर दुसरीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Sharad Pawar takes oath as a Rajya Sabha MP during the swearing-in ceremony in Parliament,
Sharad Pawar takes oath as a Rajya Sabha MP during the swearing-in ceremony in Parliament,Sarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha Swearing Ceremony : ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपचे रामराव वडकुते आणि माया ईवनाते तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे हे सर्व नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य आज खासदारकीची शपथ घेणार आहेत.

राज्यसभेत आज या खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी देशभरातील विविध राज्यांतील अनेक दिग्गज नेते राज्यसभा खासदारकीची आज शपथ घेतील. यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचाही समावेश आहे.

या सर्व सदस्यांना राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन या नव्या शपथ देणार आहेत. मात्र, आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे शपथ घेणार नसून ते 10 एप्रिलला शपथ घेण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar takes oath as a Rajya Sabha MP during the swearing-in ceremony in Parliament,
Sunetra Pawar News : सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाल्या, 'बारामती पोटनिवडणुकीसाठी...'

तसंच शरद पवारांचे नातू तथा दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे 9 एप्रिलला शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विनोद तावडे आणि पार्थ पवार सोडून इतर सर्व सदस्य आज खासदारकीची शपथ घेणार आहेत.

Sharad Pawar takes oath as a Rajya Sabha MP during the swearing-in ceremony in Parliament,
Ashok Kharat : 'घुसला घराघरात..', 'नागोबा डोलवीत होता..'; अशोक खरातच्या भोंदूगिरीवरील गाण्यांचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

आज पवार कुटुंबात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. ते म्हणजे एकीकडे शरद पवार राज्यसभा खासदारकीची शपथ घेतील. तर दुसरीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com