Baramati Election News : बारामती निवडणुकीत 1991 ची पुनरावृत्ती होणार; अजितदादा ते सुनेत्रा पवार, जाणून घ्या हा इतिहास...

Baramati election 2026, Ajit Pawar news, Sunetra Pawar election : बारामती मतदारसंघातून 1991 आणि 1995 या दोन विधानसभेच्या निवडणूका अजित पवार यांनी काँग्रेसकडून लढविल्या.
Ajit Pawar, Sunetra Pawar
Ajit Pawar, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी (ता. 6) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच १९९१ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यात आमदार व्हावे लागेल. त्यामुळे अजित पवार यांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार सोमवारी अर्ज दाखल करत आहेत. राष्ट्रवादीचे बहुसंख्य मंत्री, आमदार, पदाधिकारी, पवार कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित असतील.

पवार कुटुंबियांच्या परंपरेनुसार सकाळी श्री क्षेत्र कण्हेरी येथील मारुतरायाचे दर्शन घेत त्या विद्या प्रतिष्ठानवरील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी जाणार आहेत. तेथून बारामतीतील कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या व त्यानंतर इंदापूर रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी त्या अभिवादन करतील. सकाळी साडेदहा वाजता कविवर्य मोरोपंत सभागृहात मेळावा होणार असून तेथे त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. तेथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय भवन येथे जाणार आहे.

Ajit Pawar, Sunetra Pawar
Teachers Recruitment : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी आता नवा नियम; निवड प्रक्रिया झाली आणखी कडक...

इतिहासाची पुनरावृत्ती

1991 मध्ये अजित पवार हे सुरवातीला खासदार म्हणून निवडून गेले होते व पुन्हा पोटनिवडणूकीतून ते बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. सन 1991 ते सन 2025 अशी तब्बल 35 वर्षे अजित पवार मोठया मताधिक्याने बारामतीतून विजय होत होते. आता सुनेत्रा पवार याही राज्यसभेवर खासदार झाल्या आणि आता त्याही पोटनिवडणूकीतूनच आमदार म्हणून निवडून जाणार आहेत.

दुसऱ्या महिला आमदार

बारामती विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी 1952 मध्ये गुलाबराव मुळीक, 1957 मध्ये नानासाहेब जगताप हे बारामतीचे आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 1962 मध्ये काँग्रेसच्या मालतीबाई शिरोळे या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेल्या. आता मालतीबाई शिरोळे यांच्या नंतर दुस-या महिला आमदार म्हणून सुनेत्रा पवार इतिहास घडवतील.

Ajit Pawar, Sunetra Pawar
School Education news : मुल्यांकनात अपात्र ठरलेल्या 829 शाळांची मान्यता धोक्यात; पालकांची धाकधूक वाढली...

पवारांचे वर्चस्व

1967 मध्ये शरद पवार बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ते 1967, 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 असे सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून गेले. 1991 आणि 1995 या दोन विधानसभेच्या निवडणूका अजित पवार यांनी काँग्रेसकडून लढविल्या. सन 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्या नंतर 1999, 2004,2009.2014,2019 व 2024 असे आठ वेळा अजित पवार बारामतीचे आमदार म्हणून विजयी झाले होते.

अनेकदा राज्यात सर्वाधिक मताधिक्याचाही विक्रम अजितदादांनी केला होता. सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रिपद भूषविण्याचा मानही अजित पवार यांच्या नावावर आहे. 1967 नंतर 2026 पर्यंत तब्बल 59 वर्षे ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांची बारामतीवर निर्विवाद सत्ता होती. आता सुनेत्रा पवार बारामतीच्या आमदार होण्यासाठी सज्ज आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com