Baramati Lok Sabha: "घटस्फोट सात महिन्यांपूर्वीच झालाय..." दादांच्या 'त्या' विधानाला सुप्रिया सुळेंचा दुजोरा

Baramati Lok Sabha Election 2024: "विरोधकांकडून अनेकांना धमक्या येत आहेत, त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. आरक्षण बदलण्याची धमकी देण्यात येत आहे. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा गोष्टी होणं दुर्दैवी आहे."
Supriya Sule, Ajit Pawar
Supriya Sule, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule On Ajit Pawar: मागील काही दिवसांपूर्वी बारामतीमधील (Baramati) आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका केली होती. बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शंभर टक्के विकासकामं मीच केली आहेत. मात्र, काही लोकांनी त्यांच्या कार्य अहवालात ही विकासकामं आम्हीच केल्याचं छापलं आहे.

सध्याच्या विद्यमान खासदारांचं पुस्तक वाचायला मिळालं, त्यामध्ये नव्या नगरपालिकेच्या इमारतीचा निधी देण्यापासून ते डिझाइन करण्यापर्यंत सर्व कामं मी केली आहेत. परंतु विद्यमान खासदार त्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. दादांच्या याच वक्तव्याला आता सुप्रिया सुळेंनी एक प्रकारे दुजोरा दिला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Lok Sabha Constituency) प्रचार दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शुक्रवारी पुरंदर येथे नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, विरोधकांकडून अनेकांना धमक्या येत आहेत. त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. तसेच आरक्षण बदलण्याचीदेखील धमकी देण्यात येत आहे. याबाबतच्या तक्रारी सातत्याने आमच्याकडे येत आहेत. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा गोष्टी होणं दुर्दैवी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यवत येथे जाहीर सभेमध्ये भाजपचे (BJP) नामदेवराव ताकवले हे शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "शरद पवार हे राज्यातील आणि देशातील एक मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून लोक जर पक्षामध्ये प्रवेश करत असतील, तर यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट असू शकत नाही."

बारामती लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, निवडणूक नियोजनाचे काम प्रशासनाने करावेच. मात्र, या दुष्काळाबाबत योग्य नियोजन करावे, अशी मागणीही सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Supriya Sule, Ajit Pawar
Shirur Loksabha News : खेडमध्ये राजीनामा भाजप नेत्याचा, प्रवेश राष्ट्रवादीत पण खळबळ शिवसेनेत!

अजित पवारांनी (Ajit Pawar) सुप्रिया सुळेंच्या कामाच्या अहवालामध्ये मी केलेला कामाचा समावेश असल्याची टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, "दादांचं बरोबर आहे. आम्ही सगळ्यांनी ती विकासकामे मिळून केली आहेत. घटस्फोट सात महिन्यांपूर्वी झाला आहे. त्यापूर्वी आम्ही सर्व एकत्रच होतो," असं स्पष्टीकरण सुळे यांनी दिलं. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी दादांच्या वक्तव्याला एक प्रकारे दुजोरा दिल्याचं बोललं जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Supriya Sule, Ajit Pawar
Rohit Pawar News : रोहित पवारांचे अजितदादांना ओपन चॅलेंज; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com