Baramati Lok Sabha News : बारामतीमध्ये घड्याळ की तुतारी? राजकीय विश्लेषक म्हणतात...

Political News: बारामतीमध्ये झालेल्या नणंद-भावजय लढतीसह राज्यातील 11 जागेवरचा कल काय असणार, याविषयी सविस्तर विश्लेषण राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केले. त्यामुळे या निवडणूक झालेल्या 11 जागांचा कल काय ? असणार याचा अंदाज येतो.
Supriya Sule Vs Sunetra Pawar News
Supriya Sule Vs Sunetra Pawar NewsSarkarnama

Loksabha Election News : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यासाठी झालेल्या निवडणुकीत मंगळवारी देशातील 92 पैकी 91 ठिकाणी मतदान झाले. त्यापैकी सुरत येथील जागा बिनविरोध झाल्याने त्याठिकाणी मतदान झाले नाही. त्यामुळे मंगळवारी 91 मतदारसंघासाठी मतदान झाले. मंगळवारी राज्यातील 11 मतदारसंघासाठी मतदान पार पडले.

विशेषता या निवडणुकीत बारामतीमध्ये झालेल्या नणंद-भावजय लढतीसह राज्यातील 11 जागेवरचा कल काय असणार, याविषयी राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे या निवडणूक झालेल्या 11 जागांचा कल काय ? असणार याचा अंदाज येतो. (Baramati Lok Sabha News)

Supriya Sule Vs Sunetra Pawar News
Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत; रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल!

राज्यातील कमी मतदानाचे प्रमाण हे निश्चितच देशासाठी चिंतेचा बाब असणार आहे. त्यामुळे आगामी काळात यावर काळजी घेण्याची गरज असून राज्यात कमी होणारे मतदान हे नक्कीच लोकशाहीला हितकारक समजले जाणार नाही त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे हेमंत देसाई यांनी यावेळी बोलताना स्पष्टपणे सांगितले.

बारामतीच्या लढतीकडे राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्या विरोधात महायुतीच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी लढत झाली. या हाय होल्टेज ड्रामा असलेल्या लढतीमध्ये काय होणार याबाबत ? उत्सुकता लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामतीची जागा ही अवघड जागापैकी एक होती. त्यामुळे या जागेवर भाजपने लक्ष केंद्रित केले होते. गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. बारामतीमध्ये शरद पवार कुटुंब विरुद्ध अजित पवार कुटुंब अशी पहिल्यांदाच लढत पाहावयास मिळत आहे. प्रचाराची सांगता होईपर्यंत एकमेकावर आरोप-प्रत्यारोप झाले. त्याशिवाय वैयक्तिक टीका करण्यात आली, असेही यावेळी देसाई म्हणाले.

बारामती मतदार संघाचा निकाल काय लागणार हे खात्रीपूर्वक सांगणे चुकीचे आहे. परंतु आपण एक अंदाज व्यक्त करत आहोत. प्रस्थापिताविरोधात जर कौल असेल तर लोक मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. अन् ते त्या मतदानातून दाखवून देतात.

Supriya Sule Vs Sunetra Pawar News
Mahadev Jankar news : सुनेत्रा पवारांना किती मताधिक्य मिळणार ? जानकरांनी सांगितला आकडा !

अजित पवार यांनी माजी आमदार विजय शिवतारे व हर्षवर्धन पाटील यांच्याशी जुळवून घेतलेले आहे. त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या नेतेमंडळीचे जरी सूर जमले असले तरी कार्यकर्त्यानी जुळवून घेतले की नाही महत्वाचे आहे.

सुप्रिया सुळे यांची संसदेतील कामगिरी चांगली राहिली आहे. त्यांनी विविध विषयावरील चर्चेत सहभाग घेतला आहे. बारामती जर अजित पवारांना पराभव स्वीकारावा लागला तर त्यांच्या राजकारणाला मोठा फटका बसणार आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला तरीही शरद पवार यांच्यासाठी फारसा मोठा धक्का नसणार आहे कारण की, शरद पवार यांचे राजकारण संपत आले आहे. मात्र, या उलट अजित पवारांसाठी मात्र मोठा धक्का असेल, असेही यावेळी देसाई यांनी स्पष्ट केले.

Supriya Sule Vs Sunetra Pawar News
Baramati Lok Sabha Election 2024 Voting: मतदानात बारामतीकरांचा निरुत्साह; फटका कुणाला बसणार?

खडकवासला मतदारसंघात कमी मतदान कोणाच्या पथ्यावर ?

खडकवासला मतदारसंघात कमी झालेले मतदान हे अजित पवार गटाच्या पथ्यावर पडणार आहे. शहरी भागातील मतदार हा भाजपची ओळख समजाला जातो. मात्र, या ठिकाणी मतदान कमी झाल्याने त्याचा अनुकूल प्रतिसाद सुळे यांना मिळाला आहे. त्यामुळे सुळे यांना या ठिकाणी जास्तीची भेट मिळणार नसली तरी मात्र विरोधातील उमेदवार या ठिकाणी फारशी आघाडी घेईल, असे चित्र दिसत नाही. त्यामुळे बारामतीमधील ही लढत अटातटीची होणार आहे. गेल्या निवडणुकीत कांचन कुल यांना या मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली होती, असेही यावेळी देसाई यांनी सांगितले.

Supriya Sule Vs Sunetra Pawar News
Baramati Lok Sabha 2024: 'मेरे पास मेरी माँ है... म्हणणाऱ्या अजितदादांचे सख्ख्या भावानेच उपटले कान; ८६ वर्षांच्या आईला राजकारणात...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com