Sunetra Pawar News : माझ्या बायकोला निवडून दिले तर, माझा तुम्हाला फायदा होणार !

Baramati Lok Sabha Constituency : बायको घरी म्हणाली ए हे काम करुन दे तर सकाळी मला करुन द्यावेच लागणार,अजित पवारांचे वक्तव्य..
Sunetra Pawar- Ajit Pawar
Sunetra Pawar- Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात जाऊ लागला आहे.त्यामुळे आघाडीसह महायुतीच्या नेत्यांनी प्राचारांमध्ये जोर लावण्याचा पाहायला मिळत आहे. महायुती उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानात उतरले असून खडकवासला मतदारसंघांमध्ये ते नागरिकांशी संवाद आणि भेटीगाठी घेत आहेत.

अजित पवार हे मंगळवारी रात्री खडकवासला विधानसभा मतदारसंघात बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नागरिकांच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत होते. खडकलावासला हा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघांमध्ये तब्बल साडेसहा लाख मतदान आहे. खडकवासल्याचा मतदार ज्याच्या पारड्यात आपलं बहुमत टाकेल तोच पुढचा खासदार होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे विशेष करून अजित पवार यांनी या मतदारसंघांमध्ये आपल्या लक्ष केंद्रित केलं आहे. त्यादृष्टीने नुकतेच त्यांनी या भागामध्ये प्रचार कार्यालयाच्या देखील उद्घाटन केलं आणि आमदार भीमराव तापकीर यांना प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunetra Pawar- Ajit Pawar
Raj Thackeray news : वहिनींसाठी राज ठाकरे बारामतीच्या मैदानात !

दरम्यान, मंगळवारी खडकवासला धरण परिसरातील गावांमध्ये प्रचार करताना अजित पवार (Ajit Pawar ) म्हणाले, या भागातील गावाची ८० टक्के जागा एनडीए साठी घेतलीय. त्यामुळे स्थानिकांवरती जी बंधन निर्माण झाले आहेत. त्याबाबत तोडगा काढायचा असल्यास संरक्षण मंत्री ज्या विचाराचा आहे. त्याच विचाराचा खासदार संसदेत गेला पाहिजे. तरच याबाबत तोडगा निघू शकतो. गेल्यावेळी वेगळ्या विचाराचा खासदार इथून निवडून देण्यात आला. त्याचं तिथं काहीच चाललं नाही. आता ते खासदार आम्हाला सोडून गेले आहेत, मात्र आम्ही आमचा पक्ष ठेवला असल्याचे सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.

अजित पवार पुढे म्हणाले,आम्ही लोकांना घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन करत आहोत. जेणेकरून स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकू. स्थानिक तरुणांना एनडीए मध्ये नोकरीमध्ये प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या माध्यमातून एक शिष्टमंडळ संरक्षण मंत्र्यांना जाऊन भेटेल आणि या माध्यमातून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

माझा तुम्हाला फायदाच होणार आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, राज्य सरकार त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणू शकेल. यात माझी पण जबाबदारी वाढणार आहे. उद्याच्याला बायको घरी म्हणाली ए हे काम करुन दे तर सकाळी मला करुन द्यावेच लागणार आहे, नाहीतर माझ काही खरं नाही, असेही दादा मिश्किलपणे म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Sunetra Pawar- Ajit Pawar
Sanjog Waghere : दहावी पास वाघेरे कोट्यधीश; पण नावावर नाही एकही मोटार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com