Raj Thackeray news : वहिनींसाठी राज ठाकरे बारामतीच्या मैदानात !

Baramati Lok Sabha Constituency : बारामती मतदारसंघात राज ठाकरेंची होणार सभा, लवकरच वेळ आणि तारीख केली जाणार जाहीर
Raj Thackeray - Sunetra Pawar
Raj Thackeray - Sunetra PawarSarkarnama

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. असं असलं तरी अद्याप मनसैनिक प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मनसेच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेतली आणि पुढील रणनीतीबाबत चर्चा केली.

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीतील निवडणूक लढवण्यासाठी 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची 20 एप्रिलला छाननी झाली. त्यामध्ये पाच अर्ज बाद करण्यात आले, तर 46 अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणामध्ये राहिले आहेत. या 38 उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे आता निवडणूक प्रचाराला वेग आला असून, सुरुवातीच्या काळात भेटीगाठींचा सुरू असलेला प्रचार संपून आता ठीक ठिकाणी सभांचा आयोजन होताना पाहायला मिळत आहे. राज्य तसेच देश पातळीवरील नेते आपल्या उमेदवारांसाठी प्रचार घेत असून, यामुळे निवडणुकीचे वातावरण निर्मिती होण्यासाठी मदत मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी राज ठाकरे हे महायुतीचा प्रचार करणार का ?याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही.

याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानी मनसेची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये पुढील काळात पुणे जिल्ह्यात तसेच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कशाप्रकारे प्रचार करण्यात येणार याबाबतची रणनीती आखण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघांत मनसेचे तालुकास्तरीय मेळावे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेणार आहेत. मात्र, अजून वेळ आणि ठिकाण ठरलेलं नाही. लवकरच ठिकाण ठरवलं जाईल, अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी दिली.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Raj Thackeray - Sunetra Pawar
Sunetra Pawar News : सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; 'या' घोटाळ्याप्रकरणी 'क्लीन चीट'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com