Baramati Election News : बारामतीत अजितदादांचे 8 उमेदवार बिनविरोध कसे? युगेंद्र पवारांचे पहिल्यांदाच गंभीर आरोप

Maharashtra civic polls 2025 : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, नगराध्यक्षपदाचा उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले नाही.
Yugendra Pawar, Ajit Pawar
Yugendra Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Municipal Election : महाराष्ट्रातील बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच मजबूत मुसंडी मारली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी (21 नोव्हेंबर) पक्षाचे तब्बल 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी यावर गंभीर आरोप केले आहेत.

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार बिनविरोध आले आहेत. त्याबाबत बोलताना योगेंद्र पवार म्हणाले, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे आठ उमेदवार बिनविरोध झाले, त्यापैकी चार ठिकाणी आमच्या पक्षाचे उमेदवार होते. या उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रत्येकी 20-20 लाख रुपये दिले, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

आमचे उमेदवार हे कष्ट करणारे आणि सामान्य घरातले आहेत. त्यांनी दहा वर्षे कष्ट केले तरी त्यांना वीस लाख रुपये कमवता येणार नाही. त्यामुळे एवढ्या सहजतेने 20 ते 25 लाख मिळत असल्याने ते चार लोक फोडण्यात त्यांना यश आले असा आरोप युगेंद्र पवार यांनी केला.

Yugendra Pawar, Ajit Pawar
एका लग्नासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी बदलले सरकारी कार्यक्रमाचे ठिकाण!

ज्या चार उमेदवारांनी माघार घेतली, त्यापैकी दोन उमेदवार हे नवीनच आमच्या पक्षात आले होते. ते पूर्वी पक्षाचं काम करत नव्हते. त्यांनी आम्हाला सांगितलं की, आम्ही चांगलं काम करू दाखवू, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि उमेदवारी दिली. मात्र बरेचसे लोक असंच काहीतरी करण्यासाठी उमेदवारी मागत असतात. कारण मागच्या 30 वर्षांमध्ये सत्ताधारी पक्षांनी अशा प्रकारची सवय बारामतीतील उमेदवारांना लावली आहे, असेही युगेंद्र पवार म्हणाले.

Yugendra Pawar, Ajit Pawar
CJI Bhushan Gavai : निवृत्तीनंतर पुढे काय? CJI गवईंचा ‘प्लॅन’ ठरला, ‘त्या’ निर्णयाबाबत महिला जजच्या असहमतीवरही चुप्पी तोडली

आमच्या पुढे खूप मोठी शक्ती उभी आहे. त्यांच्याकडे सत्ता आणि पैसा आहे. याचा वापर करून दबाव आणून त्यांनी काही गोष्टी केल्या आहेत. आणि त्यात दोन-चार लोक सोडून जाणं, हे स्वाभाविक आहे, असा आरोप युगेंद्र पवार यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com