Baramati : बारामतीच्या विकासाला आणखी एक बुस्टर डोस : अजितदादांच्या प्रस्तावाला CM फडणवीसांचा ग्रीन सिग्नल

Baramati Taluka PMRDA : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बारामती तालुक्याचा पीएमआरडीएमध्ये समावेश करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

PMRDA News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती तालुक्याचा आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये अर्थात (पीएमआरडीए) समावेश होणार आहे. त्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याबाबत प्रस्ताव देण्याबाबत राज्य शासनाने पत्र दिले होते. त्यानुसार 'पीएमआरडीए ने 2 सप्टेंबर रोजी प्रस्ताव पाठविला आहे.

बारामती शहर आणि तालुक्यातही नागरिकरण वाढत आहे. त्यामुळे त्या भागातील रस्ते व इतर सुनियोजित विकासासाठी स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता आहे. त्यासाठी बारामती तालुक्याचा पीएमआरडीए' मध्ये समावेश करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला फडणवीस यांनीही तत्वतः मंजुरी दिल्याचे सांगितले जाते.

पीएमआरडीए' हद्दीत सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरे, मावळ, मुळशी आणि हवेली हे तालुके तसेच, भोर दौंड, शिरूर, खेड, पुरंदर आणि वेल्हे या तालुक्यांतील निवडक भागांचा समावेश आहे. या अंतर्गत 2 महापालिका, 3 कैन्टोन्मेंट बोर्ड, 7 नगरपालिका परिषद आणि 2 नगरपंचायतीचा समावेश होतो. या भागातील रस्ते, तसेच सुनियोजित नागरीकरणासह विविध विकासकामे पीएमआरडीए'च्या माध्यमातून केली जात आहेत. त्यामध्ये बारामती तालुक्याचीही भर पडेल, अशी चर्चा आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Supriya Sule : सुप्रिया सुळेंना नाशिकच्या 'त्या' रस्त्याचा झाला त्रास, लगेच व्हिडीओ ट्विट करुन सरकारकडे काय केली मागणी?

बारामती तालुक्याचा 'पीएमआरडीए मध्ये समावेश करावा, यासाठी शासनाकडून 'पीएमआरडीए' प्रशासनाला प्रस्ताव पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Vasant Gite Politics: उद्धव ठाकरेंच्या नेत्याचा कडक इशारा, माता भगिनींपर्यंत जाऊ नका, अन्यथा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com