Beed News : बीडमधील तरुण तहसिलदार राकेश गिड्डेंच्या मृत्यूचं गूढ वाढलं : घटनास्थळाची पाहणी करताच वडिलांच्या मनात 5 प्रश्नांनी वादळ

Beed News : तहसिलदार राकेश गिड्डे यांच्या मृत्यूबाबत वडिलांनीही संशय व्यक्त केला असून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Beed Kej Tehsildar Rakesh Gidde Dies
Beed Kej Tehsildar Rakesh Gidde DiesSarkarnama
Published on
Updated on

Tahsildar Rakesh Gidde Death : बीड जिल्ह्यातील केजचे तहसिलदार राकेश गिड्डे यांच्या आकस्मित मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावी अजूनही शोकाकूल वातावरण आहे. पण त्यांचा मृत्यू केवळ एक अपघात होता की तो घातपात होता? यावर मागील काही दिवसांपासून सुरुवात आहे. गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत यापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. आता राकेड गिड्डे यांचे वडील अण्णासाहेब गिड्डे यांनीही निधनाबद्दल संशय व्यक्त केला आहे.

अण्णासाहेब गिड्डे यांनी खासगी वाहनांवर अनेक वर्षे चालक म्हणून काम केले होते. त्यांनी अपघातग्रस्त वाहनाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात त्यांना काही संशयास्पद बाबी आढळल्या होत्या. शिवाय, राकेश गिड्डे हे त्या रात्री त्यांचे कार्यक्षेत्र नसलेल्या भागात लातूरच्या दिशेने कशासाठी निघाले होते? दिवसभर त्यांच्या सोबत त्यांचे नेमके कोणते मित्र होते? टोल नाक्यावर त्यांचे वाहन साडेआठ वाजता दिसले असेल, तर पुढील दोन-अडीच तास ते कुठे होते? अपघातानंतर त्यांचा मोबाईल, लॅपटॉप गायब झाला आहे, त्याचे काय झाले, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. त्यांचे अत्यंत जवळचे काही लोक अपघातानंतर गायब आहेत, अशी शंकादेखील बीडमधील काही माध्यमांनी उपस्थित केली आहे. त्याचीही चौकशी करा, अशी मागणी गिड्डे यांनी केली आहे.

गिड्डे पुढे म्हणाले, ‘अत्यंत गरीब परिस्थितीत राकेश शिकला, स्वतःच्या कष्टाने उभा राहिला. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी तो काम करत होता. त्याने काही गरीब शाळकरी मुली दत्तक घेतल्या होत्या. कित्येक शेतकऱ्यांचे पिढ्यांचे जमिनीचे वाद सोडवले होते. त्याच्या जाण्याने आम्हाला धक्का बसला आहेच, मात्र त्याच्यावर प्रेम करणारे मराठवाड्यातील अनेक लोक हादरून गेले आहेत. तो आम्हाला सोडून गेलाय, हे वास्तव आम्ही स्वीकारले आहे. मात्र, ते का घडले, कसे घडले, हे कळायला हवे. त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. यात काही चुकीचे घडले असेल, तर आम्हाला ते जाणून घेण्याचा व न्याय मागण्याचा अधिकार आहे.’

Beed Kej Tehsildar Rakesh Gidde Dies
Beed News: बीडमधील भाजप नगरसेविका पतीला मारहाण प्रकरणाला जातीय रंग, सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी घेतली एसपींची भेट

गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत यापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. तहसिलदार दुलाजी मेंडके आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी या दोन्ही निवेदनात केली आहे. प्रामुख्याने अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून तहसिलदार राकेश गिड्डे यांचा मोबाईल व महत्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात? असा संशय बळावल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात संशय राहू नये, यासाठी उच्चस्तरीय चौकशी नेमून वस्तुस्थिती लवकरात लवकर स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

Beed Kej Tehsildar Rakesh Gidde Dies
Beed News : बीडमधील तरुण तहसिलदाराचा अपघात की घातपात? : 'एका' कारणामुळे राकेश गिड्डेंच्या मृत्यूबद्दल संशय वाढला

भीषण कार अपघातात निधन :

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ 9 एप्रिल रोजी झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तवला होता. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. एका कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com