Kishor Aware Murder Case : किशोर आवारे हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड भानू खळदेला अटक; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

Maval Crime News : अपमानाचा बदला घेण्यासाठी भानू खळदे आणि गौरव खळदे या बापलेकाने किशोर आवारेंच्या हत्येचा कट रचला.
Maval Taluka Crime News :
Maval Taluka Crime News : Sarkarnama
Published on
Updated on

Kishor Aware Murder Case :  पुण्यात दोन महिन्यांपूर्वी तळेगाव दाभाडे येथे झालेल्या किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  किशोर आवारे (Kishor Aware) यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगरसेवक भानू खळदे (Bhanu Khalde) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुंडा स्कॉड पथकाने नाशिकमध्ये अटक केली आहे.

गेल्या दिड महिन्यांपासून मास्टरमाईंड भानू खळदे पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर गुंडा स्कॉडच्या पथकाने खळदेला अटक केली आहे. सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांचा यावर्षी १२ मे रोजी भरदिवसा नगरपरिषद कार्यालय आवारातच खून केला होता.

Maval Taluka Crime News :
Thackeray-Shinde Politics : सावधान गद्दारांनो ..! दिग्रसमध्ये लावलेल्या बॅनर्समधून गवळी, राठोडांना इशारा

किशोर आवारे यांची हत्या केल्यानंतर मुख्य संशयित भानू खळदे गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला नाशिकमधून अटक केली आहे. प्राथमिक तपासानुसार, माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे यानेच आवारे यांच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली होती. वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी गौरव खळदेने आवारे यांची हत्या केली.

काही महिन्यांपुर्वी माजी नगरसेवक भानू खळदे आणि  किशोर आवारे (Kishor Aware)  यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी किशोर आवारे यांनी खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. याच रागातून गौरवने नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या आवारातच किशोर आवारे यांची हत्या घडवून आणली होती.

Maval Taluka Crime News :
Kishore Aware Murder Case : किशोर आवारे खूनप्रकरणी मावळचे आमदार शेळकेंच्या विरोधात गुन्हा दाखल..

अपमानाचा बदला घेण्यासाठी भानू खळदे आणि गौरव खळदे या बापलेकाने किशोर आवारेंच्या हत्येचा कट रचला. 12 मे रोजी नगरपरिषद कार्यालयासमोरच गौरव खळदे याच्यासह त्याच्या काही साथीदारांनी आवारे यांची हत्या केली. भानू खळदे त्यानंतर फरार झाला, पण पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 24 तासांच्या आतच या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींनीही भानू खळदेचा मुलगा गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबूली दिली. तेव्हापासून पिंपरी चिंचवड पोलिसांनी भानू खळदेचा शोध सुरू होता.

Edited By- Anuradha Dhawade 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com