ED raid in Pune: पुण्यात ईडीची मोठी कारवाई; मुश्रीफांच्या मनी लॉण्ड्रिग प्रकरणाशी आहे संबंध

व्यावसायिकांच्या कार्यालयात आज सकाळीच धाड टाकत ईडीने कारवाई केली आहे.
Ed Raid In Aurangabad
Ed Raid In AurangabadSarkarnama
Published on: 
Updated on: 

ED raid in Pune: पुणे शहरातील काही ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मनी लॉण्ड्रिग प्रकरणााशी संबंधित असलेल्या काही व्यवसायिकांच्या कार्यालयांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहेत. विवेक गव्हाणे, चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया या व्यवसायिकांच्या कार्यलयात ईडीने छापेमारी करत तपास सुरु केला आहे..

पुण्यातील व्यावसायिकांच्या घर कार्यालय अशा 9 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. आज (३ एप्रिल) पहाटेपासूनच या कारवाईला सुरुवात झाली.  मुंबईतील ईडीच्या पथकाने पहाटेपासूनच व्यावसायिक विवेक गव्हाणे, सनदी लेखापाल जयेश दुधडिया आणि ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थांवरही धाड टाकल्याने शहरात चर्चा सुरु झाल्या आहेत. पुण्यातील हडपसर, गणेश पेठ, प्रभात रस्ता आणि सिंहगड रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.  

Ed Raid In Aurangabad
BJP Vs Congress News : राहुल गांधीवरील कारवाईविरोधात पिंपरीतून कॉंग्रेस मोदींना पाठवणार एक लाख पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावर ही छापेमारी केली आहे. गेल्या महिन्यातही  ईडीने गायकवाड यांच्या कार्यालयात छापेमारे केली होती. या कारवाईत ईडी त्यांच्या कार्यालयातून काही कागदपत्रे जप्त केली होती. तसेच गायकवाडांची चौकशी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.