Pimpri Chinchwad politics: पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

Uddhav Thackeray news News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा घेतला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजितदादांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या कुटुंबाची भेट घेतली.
uddhav thackeray, ajit pawar
uddhav thackeray, ajit pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. येत्या काळात लवकरच पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा घेतला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजितदादांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मावळ लोकसभा निवडणूक लढवणारा हा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात आहे.

रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा घेतला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या अजित पवार यांनी या निमित्ताने पत्रकाराशी संवाद साधला. त्यासोबतच आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मेळाव्यास मोठी गर्दी केली होती.

uddhav thackeray, ajit pawar
Jayant Patil Vs Gopichand Padalkar : जयंत पाटील 15 वर्षांपूर्वीच गोपीचंद पडळकरांच्या डोक्यात गेले होते.. दोघांच्या वादाची A टू Z स्टोरी

दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनकडून मावळ लोकसभा निवडणूक लढवलेल्या संजोग वाघेरे यांच्या कुटुंबाशी चर्चा केली. यामुळे पुन्हा एकदा संजोग वाघेरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याची चर्चा यानिमीत्ताने पुन्हा एकदा रंगली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष असलेल्या संजोग वाघेरेंच्या पत्नी उषा वाघेरेंशी अजितदादा रविवारी चर्चा करणार आहेत. त्यामुळे, संजोग वाघेरे हाती पुन्हा एकदा घड्याळ बांधतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुळात मी शिवसेनेत असलो तरी माझ्या पत्नी आजही राष्ट्रवादीतचं आहेत आणि मी तूर्त तरी शिवसेनेत आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर पाहुयात, असं म्हणत संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाचे संकेत ही दिले आहेत. मात्र, पवार-वाघेरे कुटुंबीयांचे घरगुती संबंध असल्याचही त्यांनी स्पष्ट केले.

uddhav thackeray, ajit pawar
Vijay Wadettivar On election Commission : निवडणूक आयोग चित्र-विचित्र; चोरीची तक्रार करणाऱ्यांनाच मागतो पुरावे; वडेट्टीवारांचा संताप

हाती घडयाळ घेणार का ?

गेल्या 40 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या संजोग वाघेरे यांनी डिसेंबर 2023 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेत प्रवेश केला होता. डिसेंबरमध्ये संजोग वाघेरे हे ठाकरे गटात आले. त्यानंतर त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभूत केले होते. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा संजोग वाघेरे हाती घडयाळ घेणार का ? याची चर्चा रंगली आहे.

uddhav thackeray, ajit pawar
Solapur NCP-BJP News : राजन पाटलांना लाल दिवा देऊन अजितदादांनी बाजी मारली; पण भाजपचे प्रशांत परिचारक, शहाजी पवार अजूनही वेटिंंगवरच

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे तुमच्या राष्ट्रवादीत येणार आहेत का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर, संजोग वाघेरे हे ठाकरे यांच्यासोबत आहेत, त्यांची पत्नी उषा वाघेरे ह्या आमच्यासोबत आहेत. असे अनेकांच्या घरात, आमच्यासह उदाहरणे आहेत, असे मिश्कील उत्तर अजित पवार यांनी दिले.

महायुती म्हणून विधानसभा, लोकसभेत लढलो आहोत. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्या ठिकाणची परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील युतीसंदर्भाने बोलताना सांगितले.

uddhav thackeray, ajit pawar
Uddhav Thackeray: राष्ट्रवादीनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेची स्वबळाची घोषणा! स्थानिक नेत्यांवर सोपवला निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com