Vijay Wadettivar On election Commission : निवडणूक आयोग चित्र-विचित्र; चोरीची तक्रार करणाऱ्यांनाच मागतो पुरावे; वडेट्टीवारांचा संताप

Election complaint proof controversy News : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत शेवटच्या तासात पंधरा ते वीस टक्के मतदान कसे वाढले? याचे पुरावे देण्याची मागणी केली.
Congress on Election Commission
Congress on Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : काँग्रेसचे नेते राहूल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर मत चोरीचे आरोप करीत आहेत. यावर आयोगाने त्यांना त्यांना सात दिवसांच्या आत पुरावे द्या, अन्यथा माफी मागा, असे आवाहन केले आहे. मात्र, राहूल गांधी आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे दिसून येते. उलट त्यांच्या आरोपांना आणखीच धार आली आहे. यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत शेवटच्या तासात पंधरा ते वीस टक्के मतदान कसे वाढले? याचे पुरावे देण्याची मागणी केली. चोर चोरी करून गेले त्याची तक्रार करणाऱ्यांनाच पुरावे मागणारा चित्र विचित्र आयोग यापूर्वी देशाने कधी बघितला नसल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

आधी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत सायंकाळी सरासरी पंधरा ते वीस टक्के मतदान कसे वाढले? अशी विचारणा करून हे खरे असेल तर रांगा लागल्याचे पुरावे द्या, सीसीटीव्हीचे फुटेच द्या? अशी मागणी त्यांनी केली. विजय वडेट्टीवार ( Vijay wadettivar) म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासूनच आम्ही आयोगाकडे पुरावे मागत आहोत. मात्र ते अद्याप देण्यात आलेले नाहीत.

Congress on Election Commission
Ajit Pawar Politics : भुजबळांचे चिमटे, दादांनी हळूच फडणवीसांकडे पास केला चेंडू

आजवरच्या निवडणुकीस सायंकाळी पंधरा ते वीस टक्के मतदान झाल्याचे ऐकिवात नाही. याच वेळी कसे काय वाढले. प्रत्येक मतदान केंद्रावरचे आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. तेसुद्धा दिले जात नाही. पाच वाजता मतदान संपते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाले असते तर रांगा लागल्याचे दिसल्या असत्या. याचे पुरावे निवडणूक आयोगाने देणे गरजेचे असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Congress on Election Commission
Sanjay Raut : निवडणूक आयुक्त भाजपच्या हस्तकाप्रमाणे वागले, संजय राऊतांचा हल्लाबोल

सात दिवसात प्रतिज्ञापत्र मागताय म्हणजे पुरावे तुमच्याकडे होते असे सांगून आयोगाने नष्ट केल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. चोराने चोरी करायची आणि मुद्देमाल मात्र मालकाकडून मागायचा हा विचित्र प्रकार आहे. चोर करून गेले. त्याची तक्रार करणाऱ्यांनाच पुरावे मागितले जात आहे. उद्या निवडणूक आयुक्त राजीव कुमार राज्यसभेवर किंवा इतर मंडळावर दिसले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असाही टोला वडेट्टीवारांनी लगावला.

Congress on Election Commission
Ambadas Danve News : सगळेच खेळ मोबाईलवर खेळले जात नाहीत ; बॅडमिंटन हाॅलला गळती लागल्यानंतर अंबादास दानवेंचा नव्या क्रीडा मंत्र्यांना टोला..

राहूल गांधी (Rahul Gandhi) माफी मागणार नाहीत, आमचे झालेले पत्र व्यवहार सगळे रेकॉर्डवर आहेत. आम्ही दिलेल्या पत्राचे उत्तर निवडणूक आयोगाने दिलेले नाही. आम्ही केलेल्या आरोपांचे उत्तर तसेच मागितलेले माहिती त्यांनी दिली असती तर निवडणूक आयोगाला अधिकार प्राप्त झाला असता असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Congress on Election Commission
NCP Politics : राष्ट्रवादीचं ठरलंय! युतीचं डोक्यातून काढून टाका अन् जिथे आपली ताकद तिथे उमेदवार द्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com